आरबीआय/2019-20/194
डीजीबीए.जीबीडी.क्र.1799/42.01.029/2019-20
मार्च 27, 2020
सर्व एजन्सी बँका
महोदय / महोदया,
सरकारी खात्यांचे वार्षिक बंद केले जाणे - केंद्र/राज्य सरकारांचे व्यवहार - विद्यमान वित्तीय वर्षासाठी (2019-20) विशेष उपाय
वित्तीय वर्ष 2019-20 साठी एजन्सी बँकांनी केलेल्या सर्व सरकारी व्यवहारांचे लेखा-कर्म त्याच वित्तीय वर्षात केले गेले पाहिजे. कोविड-19 मुळे देशभरात निर्माण झालेली सध्याची अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेता, मार्च 31, 2020 साठी, सरकारी व्यवहार कळविण्यासाठी व हिशेबासाठी पुढील व्यवस्था ठेवण्यात आल्या आहेत.
(2) सर्व एजन्सी बँकांनी त्यांच्या नेमलेल्या शाखा, सरकारी व्यवहारांसंबंधाने करावयाच्या ओव्हर दि काऊंटर व्यवहारांसाठी, मार्च 31, 2020 रोजीही नेहमीच्याच कामकाजाच्या वेळेत सुरु ठेवाव्यात.
(3) रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम (आरटीजीएस) मार्फतचे सरकारी व्यवहार, मार्च 31, 2020 रोजी विस्तारित वेळेसाठी केले जातील आणि त्यासाठी भारतीय रिझर्व बँकेचा प्रदान व समायोजन प्रणाली विभाग (डीपीएसएस) योग्य त्या सूचना देईल. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) मार्फत केलेले व्यवहार ह्याप्रमाणेच मार्च 31, 2020 रोजी 24.00 तास सुरु ठेवले जातील.
(4) सरकारी चेक्स गोळा करण्यासाठी, मार्च 31, 2020 रोजी विशेष समाशोधन केले जाईल व आरबीआयचे डीपीएसएस त्यासाठी योग्य त्या सूचना देईल.
(5) केंद्र व राज्य सरकारांचे व्यवहार आरबीआयला कळविण्यासाठी तसेच, जीएसटी/ई-रिसीट्स लगेज फाईल्स अपलोड करण्यासाठी, मार्च 31, 2020 रोजी, रिपोर्टिंग विंडो विस्तारित केली जाईल व ती एप्रिल 1, 2020 रोजीच्या 12.00 वाजेपर्यंत खुली ठेवली जाईल.
(6) एजन्सी बँकांनी ह्याची नोंद घ्यावी व वर दिलेल्या विशेष व्यवस्थांना सुयोग्य प्रसिध्दी द्यावी.
आपली विश्वासु,
(चारुलथा एस. कार)
मुख्य महाव्यवस्थापक |