आरबीआय/2019-20/185
एफएमआरडी.एफएमआयडी.क्र.24/11.01.007/2019-20
मार्च 27, 2020
प्रति,
सर्व पात्र असणारे मार्केटमधील सहभागी
महोदय /महोदया,
लीगल एंटिटी आयडेंटिफायर - अंतिम तारखेचा विस्तार
नॉन-डेरिवेटिव मार्केट्समध्ये भाग घेण्यासाठी, लीगल एंटिटी आयडेंटिफायर (एलईआय) च्या आवश्यकतेवरील भारतीय रिझर्व बँकेने दिलेले परिपत्रक एफएमआरडी. एफएमआयडी.क्र.10/11.01.007/2018-19 दि. नोव्हेंबर 29, 2018 चा संदर्भ घ्यावा. त्याचप्रमाणे, नॉन-डेरिवेटिव मार्केट्स साठी एलईआयच्या अंमलबजावणीसाठीच्या सुधारित कालरेषांवरील परिपत्रक एफएमआरडी.एफएमआयडी.क्र.15/11.01.007/2018-19 दि. एप्रिल 26, 2019 चाही संदर्भ घेतला जावा.
(2) मार्केटमधील सहभागींचा फीडबॅक व केलेल्या विनंत्या ह्यावर आधारित आणि कॉरोना व्हायरस डिझीज (कोविड-19) च्या साथीमुळे आलेल्या अडचणींच्या संदर्भात आणि नॉन-डेरिवेटिव मार्केट्समध्ये एलईआय प्रणालीची अंमलबजावणी अधिक सुलभतेने करता यावी ह्यासाठी, अंमलबजावणीची (टप्पा 3) कालरेषा पुढीलप्रमाणे विस्तारित करण्यात आली आहे.
टप्पा |
संस्थांचे निव्वळ मूल्य |
विद्यमान अंतिम तारीख |
विस्तारित अंतिम तारीख |
टप्पा III |
200 करोड पर्यंत |
मार्च 31, 2020 |
सप्टेंबर 30, 2020 |
(3) ह्या सूचना, भारतीय रिझर्व्ह बँक, अधिनियम 1934 च्या कलम 45 यु सह वाचित कलम 45 डब्ल्यु खाली देण्यात आल्या आहेत.
आपली विश्वासु,
(डिंपल भांदिया)
प्रभारी महाव्यवस्थापक |