आरबीआय/2019-20/172
डीओएस.सीओ.पीपीजी.बीसी.01/11.01.005/2019-20
मार्च 16, 2020
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी वगळता)
सर्व स्थानिक क्षेत्र बँका
सर्व लघु वित्त बँका आणि
सर्व पेमेंट बँका / सर्व यूसीबी / एनबीएफसी
महोदय / महोदया,
कोविड-19 - कार्यकारी व व्यवसाय सुरु ठेवण्याचे उपाय
आपणास माहितच आहे की, र्वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्युएचओ) घोषित केल्यानुसार, हा नवीन कॉरोना व्हायरस रोग (कोविड-19) ही एक देशभरात पसरलेली साथ असून ती अनेक देशांमध्ये/मधील व्यक्ती-व्यक्तींदरम्यान लक्षणीय व सातत्याने ह्या रोगाचा प्रसार करणारी तर आहेच पण त्याचबरोबर तिच्या प्रसाराची व्याप्ती व जागतिक अर्थव्यवस्थांवरील होऊ शकणारा परिणाम ह्याबाबत अनिश्चितता आहे. भारतामध्ये देखील अनेक ख-या केसेस आढळल्या असून त्यामुळे भारतीय वित्तीय प्रणालीच्या स्थितीस्थापकतेचे संरक्षण करण्यासाठी येऊ घातलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, समन्वय असलेल्या डावपेचांची गरज अत्यावश्यक आहे.
(2) राज्य सरकारांच्या यंत्रणांच्या सहकार्याने, भारत सरकार, ह्या रोगाचा स्थानिक स्तरावरील प्रसार रोखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी आधीच पाऊले उचलत असले तरीही, खाली दिलेल्या निर्देशक यादीसह, संबंधित बँका/वित्तीय संस्थांनी, त्यांच्या विद्यमान कार्यकारी व व्यवसाय-चालक उपायांच्या योजनांचा एक भाग म्हणून, ह्या पुढची पाऊले उचलणेही आवश्यक आहे :
(अ) ह्या रोगाचा स्वतःच्या संस्थेमधील प्रसाराबाबत डावपेच व देखरेख प्रणाली तयार करणे, बाधित झालेले कर्मचारी आढळल्यास, रोगाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी, प्रवास योजना व क्वारंटाईन आवश्यकता, तसेच कर्मचारी व जनता ह्यांच्यामध्ये भीती निर्माण होणे टाळणे ह्यासाठी वेळेवारी हस्तक्षेप करणे.
(ब) महत्त्वाच्या प्रक्रियांचा आढावा घेणे आणि जंतुसंसर्गामुळे किंवा प्रतिबंधक उपायांमुळे झालेल्या गैरहजेरीमुळे सेवांमध्ये होणारा कोणताही खंड टाळणे व महत्त्वाच्या इंटरफेसेस मध्ये सातत्य ठेवले जाण्याच्या उद्देशाने येऊ घातलेल्या परिस्थितीत/वातावरणात व्यवसाय सातत्य योजना (बीसीपी) ची पुनर् अंमलबजावणी करणे.
(क) अधिक चांगला प्रतिसाद व सहभाग मिळण्यासाठी, सर्व स्तरावरील कर्मचारी वर्गाबरोबर महत्त्वाच्या सूचना/डावपेच शेअर करण्यासाठी पाऊले उचलणे आणि स्वास्थ्य प्राधिकरणांकडून वेळोवेळी मिळालेल्या सूचनांवर आधारित, शंकास्पद केसेसच्या बाबतीत घ्यावयाचे प्रतिबंधक उपाय/कृती ह्याबाबत कर्मचारी वर्गाला जाणीव करुन देऊन त्यांच्याकडून अधिक चांगला प्रतिसाद व सहभाग मिळविणे.
(ड) शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात डिजिटल सुविधा वापरण्यासाठी त्यांच्या ग्राहकांना प्रोत्साहन देणे.
(3) व्यवसाय प्रक्रियेतील लवचिकतेची खात्री करुन घेण्यासाठी, पर्यवेक्षणाखालील संस्थांनी, भारतामधील कोविड -19 ची अधिक वाढ आणि तिचे अर्थव्यवस्था, जागतिक अर्थ्व्यवस्थेतील व जागतिक वित्तीय प्रणाली ह्यामधील वाढत्या दुरावस्थेमुळे झालेले परिणाम. ह्यासारख्या संभाव्य परिस्थिती- निर्मित प्रभाव /परिणामांचे, त्यांचा ताळेबंद, ऍसेटचा दर्जा व तरलता ह्यावरील परिणामांचे मूल्यमापन करावे. वरील अभ्यासांवर आधारित त्यांनी ह्या जोखमींचे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने आणीबाणीचे उपाय योजावेत व ते आम्हाला कळवावेत
(4) व्यवसाय प्रक्रिया स्थितीस्थापक राहील ह्याची खात्री करुन घेत असतानाच - व्यावसायिक व सामाजिक अशा दोन्हीही दृष्टीकोनातून - ह्यासाठी एक जलद प्रतिसाद टीम तयार केली जावी व ती टीम सर्वोच्च व्यवस्थापनाला, लक्षणीय घडामोडींची अद्यावत माहिती देत राहील आणि विनियामक/बाहेरील संस्था/एजन्सींसाठी एकमेव संपर्क बिंदूची भूमिका करील.
आपला विश्वासु,
(अजय कुमार चौधरी)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |