आरबीआय/2021-22/27
एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.10/04.09.01/2021-22
मे 5, 2021
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक
मुख्य कार्यकारी अधिकारी
लघु वित्त बँका
महोदय/महोदया,
प्राधान्य क्षेत्रात कर्ज देणे (पीएसएल) - लघु वित्त बँकांकडून (एसएफबी) एनबीएफसी - एमएफआयना कर्ज दिले जाणे
विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लघु वित्त बँकांनी (एसएफबी), एनबीएफसी-एमएफआयना, पुढे कर्ज देण्यासाठी दिलेले कर्ज हे प्राधान्य क्षेत्रात दिलेले कर्ज वर्गीकरण (पीएसएल) समजले जात नाही. कोविड-19 च्या साथीमुळे आलेल्या नवीन आव्हानांचा विचारात घेऊन आणि छोट्या एमएफआयच्या लिक्विडिटी स्थितीसाठी उपाय म्हणून ठरविण्यात आले आहे की, पंजीकृत एनबीएफसी-एमएफआयना व आरबीआयकडून ओळखल्या गेलेल्या/मान्यता मिळालेल्या ‘स्वयं-विनियामक संस्थां’चे सभासद असलेल्या आणि मार्च 31, 2021 रोजी रु.500 कोटींचा ‘ग्रॉस लोन पोर्ट फोलियो’ असलेल्या इतर एमएफआयना (सोसायट्या, ट्रस्ट इत्यादी) व्यक्तींना कर्जे देण्यासाठी, एसएफबींनी दिलेल्या नवीन कर्जांचा पीएसएल वर्गीकरण देण्यास परवानगी दिली जावी. वरीलप्रमाणे बँक कर्जासाठी, त्या बँकेच्या मार्च 31, 2021 रोजी असलेल्या प्राधान्य क्षेत्र पोर्टफोलियोच्या 10% पर्यंत परवानगी दिली जाईल.
(2) वरील कर्जवाटप मार्च 31, 2022 पर्यंत वैध असेल. तथापि, अशा प्रकारे वाटप केलेली कर्जे परतफेडीच्या/परिपक्वतेच्या तारखेपर्यंत - ह्यापैकी आधी असेल त्या तारखेपर्यंत प्राधान्य क्षेत्राखाली वर्गीकृत केली जाणे सुरुच राहील. ह्याशिवाय, आमचे पीएसएलवरील महानिर्देश दि. सप्टेंबर 4, 2020 (एप्रिल 29, 2021 रोजी अद्यावत केलेले) च्या परिच्छेद 21 खाली, पुढे कर्ज देण्यासाठी (ऑनलेंडिंग) विहित केलेल्या अटींचे बँकांनी अनुपालन करणे आवश्यक असेल.
(3) हे परिपत्रक देण्यात आल्याच्या तारखेपासून ही मार्गदर्शक तत्त्वे जारी होतील.
आपली विश्वासु,
(सोनाली सेन गुप्ता)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक |