आरबीआय/2021-22/29
डीओआर.एएमएल.आरईसी 13/14.01.001/2021-22
मे 5, 2021
सर्व नियमन संस्थांचे अध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी
महोदय/महोदया,
केवायसीचे नियतकालिक अद्यावतीकरण –
अनुपालन केले न गेल्यास खाते चालविण्यावरील निर्बंध
कृपया, फेब्रुवारी 25, 2016 रोजीच्या, केवायसीवरील महानिर्देशाच्या कलम 38 चा संदर्भ घ्यावा. त्यानुसार, विनियमित असलेल्या संस्थांनी (आरई) विद्यमान ग्राहकांच्या केवायसीचे नियतकालिक अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. देशातील निरनिराळ्या भागात कोविड-19 संबंधित निर्बंध विचारात घेता, आरईंना सांगण्यात येते की, सध्याच्या तारखेस केवायसीचे नियतकालिक अद्यावतीकरण करणे राहिले आहे. अशा ग्राहक खात्यांच्या बाबतीत, अन्य विनियामक/अंमलबजावणी एजन्सी/कोर्ट ह्यांच्या सूचनांखाली आवश्यक नसल्यास, डिसेंबर 31, 2021 पर्यंत अशा खात्यावर निर्बंध घालण्यात येऊ नयेत.
विनियमित संस्थांना असेही सांगण्यात येते की त्यांनी अशा प्रकरणांमध्ये, केवायसी अद्यावत करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांचेही सहकार्य ठेवणे सुरुच ठेवावे.
आपला विश्वासु,
(प्रकाश बलियारसिंग)
मुख्य महाव्यवस्थापक |