आरबीआय/2021-22/30
डीओआर.आरईटी.आरईसी.09/12.01.001/2021-22
मे 05, 2021
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय/महोदया,
एमएसएमई उद्योजकांना कर्ज
कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक परिपत्रक डीओआर.क्र.आरईटी.बीसी.37/12.01.001/2020-21 दि. फेब्रुवारी 5, 2021, चा संदर्भ घ्यावा.
(2) वरील परिपत्रकानुसार, कॅश रिर्झव्ह रेशो (सीआरआर) काढण्यासाठी, नेट डिमांड अँड टाईम लायाबिलिटीजमधून, एमएसएमई कर्जदारांना वाटण्यात आलेल्या कर्जाच्या सममूल्य रक्कम वजा करण्यास अनुसूचित वाणिज्य बँकांना परवानगी देण्यात आली होती. ऑक्टोबर 1, 2021 रोजी संपणा-या पंधरवड्यापर्यंत वाटप केलेल्या कर्जासाठी ही सूट, प्रति कर्जदार रु.25 लाखांपर्यंत उपलब्ध होती.
(3) डिसेंबर 31, 2021 रोजी संपणा-या पंधरवड्यापर्यंत वाटप केलेल्या अशा कर्जांसाठीही ही सूट देण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्या परिपत्रकामधील इतर सूचनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आपला विश्वासु,
(थॉमस मॅथ्यु)
मुख्य महाव्यवस्थापक |