आरबीआय/2021-22/28
डीओआर.एसटीआर.आईसी.10/21.04.048/2021-22
मे 5, 2021
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(प्रादेशिक ग्रामीण बँका आणि पेमेंट बँका वगळता)
महोदय/महोदया,
तरत्या तरतुदी (फ्लोटिंग प्रोव्हिजन्स)/काऊंटर प्रोव्हिजनिंग बफर्सचा वापर
कृपया बँकांद्वारे, तरत्या तरतुदींची निर्मिती, हिशेब (अकाऊंटिंग), प्रकटीकरणे व वापर ह्यावरील आमचे परिपत्रक डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.89/21.04.048/2005-06 दि. जून 22, 2006 व परिपत्रक डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.68/21.04.048/2006-07 दि मार्च 13, 2007 चा संदर्भ घ्यावा. त्याचप्रमाणे बँका, ‘काऊंटर सायक्लिकल प्रोव्हिजनिंग बफर’ ची निर्मिती व वापर ह्यावरील आमचे परिपत्रक डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.87/21.04.048/2010-11 दि. एप्रिल 21, 2011 चाही संदर्भ घेऊ शकतात. त्यात आम्ही सांगितले होते की, ह्या बफरचा उपयोग, आरबीआयच्या पूर्व परवानगीने, सिस्टिमवाईड डाऊनटर्नच्या कालावधीत अकार्यकारी अॅसेट्ससाठी विशिष्ट तरतुदी करण्यासाठी बँकांना परवानगी देण्यात येईल.
(2) त्यानुसार व आमची परिपत्रके परिपत्रक डीबीओडी.क्र.बीपी.95/21.04.048/2013-14 दि. फेब्रुवारी 7, 2014 व परिपत्रक बीआर.क्र.बीपी.बीसी.79/21.04.048/2014-15 दि. मार्च 30, 2015 दि. मार्च 30, 2015 अन्वये, बँकांना, त्यांच्या संचालक मंडळाने मंजुर केलेल्या धोरणानुसार अकार्यकारी अॅसेट्ससाठी विशिष्ट तरतुदी करण्यासाठी त्यांनी अनुक्रमे मार्च 31, 2013 व डिसेंबर 31, 2014 रोजी धारण केलेल्या तरत्या तरतुदी/काऊंटर सायक्लिकल प्रोव्हिजनिंग बफरच्या अनुक्रमे 33% व 50% वापरण्यास बँकांना परवानगी देण्यात आली होती.
(3) कोविड-19 संबंधित ताणतणावाचा बँकांवर होणारा विपरीत प्रभाव कमी करण्यासाठी, भांडवल जतन करण्याचा एक उपाय म्हणून असे ठरविण्यात आले आहे की, अकार्यकारी अॅसेट्ससाठी विशिष्ट तरतुदी, बँकांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीने करण्यासाठी, डिसेंबर 31, 2020 रोजी बँकांनी धारण केलेल्या तरत्या तरतुदींच्या/काऊंटर सायक्लिकल प्रोव्हिजनिंग बफरच्या 100% रक्कम वापरण्यासाठी बँकांना परवानगी दिली जावी. असा वापर, ताबडतोब व मार्च 31, 2022 पर्यंत करण्यास परवानगी आहे.
आपला विश्वासु,
(मनोरंजन मिश्रा)
मुख्य महाव्यवस्थापक |