आरबीआय/2021-22/41
सीओ.डीपीएसएस.पीओएलस.क्र.एस-106/02-14-003/2021-2022
मे 21, 2021
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सर्व अनुसूचित वाणिज्य बँका /
शहरी सहकारी बँका / राज्य सहकारी बँका /
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका / पेमेंट बँका / लघु वित्त बँका /
स्थानिक क्षेत्र बँका / नॉन-बँक पीपीआय जारीकर्ता /
अधिकृत देयक प्रणाली ऑपरेटर / सहभागी
महोदय/महोदया,
निरनिराळ्या प्रदान प्रणाली आवश्यकतांच्या अनुपालनासाठीच्या कालरेषेत शिथिलता
भारतीय रिझर्व बँकेच्या पुढील सूचनांचा संदर्भ घेतला जावा - (अ) प्रिपेड प्रदान संलेखांचे दिले जाणे व कार्यकृती ह्यावरील महानिर्देश (पीपीआय.एमडी) डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1164/02.14.006/2017-18 दि. ऑक्टोबर 11, 2017 (वेळोवेळी अद्यावत केल्यानुसार). (ब) हार्मोनायझेशन ऑफ टर्नअराऊंड टाईप (टीएटी) व प्राधिकृत प्रदान प्रणाली वापरुन अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी ग्राहक भरपाई वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.629/02.01.014/2019-20 दि. सप्टेंबर 20, 2019; (क) स्कोप अँड कव्हरेज ऑफ सिस्टिम ऑडिट ऑफ पेमेंट सिस्टिम्स वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1325/06.11.001/2019-20 दि. जानेवारी 10, 2020; (ड) गाईडलाईन्स ऑन रेग्युलेशन ऑफ पेमेंट अॅग्रिगेटर्स (पीए) अँड पेमेंट गेटवेज् (पीजी) वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1810/02.14.008/2019-20 दि. मार्च 17, 2020 आणि (ई) निरनिराळ्या प्रदान प्रणाली आवश्यकतांच्या अनुपालनासाठीच्या कालरेषेचा विस्तार वरील डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1897/02.14.003/2019-20 दि. जून 4, 2020.
(2) कोविड-19 चा पुनर् प्रादुर्भाव निरनिराळ्या बँका व अबँकीय संस्थांकडून मिळालेल्या सादरीकरणांचा विचार करुन, जोडपत्रात तपशीलवार दिलेल्या काही क्षेत्रात अनुपालनासाठी विहित केलेल्या कालरेषेचा विस्तार केला जावी असे ठरविण्यात आले आहे.
(3) हे निर्देश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 (2007 चा 51) च्या कलम 18 सह वाचित कलम 10 (2) खाली देण्यात आले आहेत.
आपला विश्वासु,
(पी. वासुदेवन)
मुख्य महाव्यवस्थापक
आरबीआय परिपत्रक सीओ.डीपीएसएस.पीओएलसी.क्र.एस-106/02-14-003/2021-2022 दि. मे 21, 2021 चे जोडपत्र टेबल
अनुक्रमांक |
सूचना/परिपत्रक |
विद्यमान कालरेषा |
सुधारित कालरेषा |
(1) |
विद्यमान असलेल्या सर्व पीपीआय देणारांनी (पीपीआय-एमडी देते वेळी), मार्च 31, 2020 रोजी (ऑडिटेड ताळेबंद) असलेल्या वित्तीय स्थितीसाठी रु.15 कोटी ह्या किमान धन (पॉझिटिव) निव्वळ मूल्य आवश्यकतेचे पालन केले पाहिजे. |
मार्च 31, 2021 रोजी असलेली वित्तीय स्थिती. |
सप्टेंबर 30, 2021 रोजी असलेली वित्तीय स्थिती. |
(2) |
हार्मोनायझेशन ऑफ टीएटी आणि प्राधिकृत प्रदान प्रणाली वापरुन अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी ग्राहक भरपाई - ‘कॅलेंडर डेज्’ ऐवजी ‘वर्किंग डेज्’ वाचले जावे. |
डिसेंबर 31, 2020 पर्यंतचे कामकाजाचे दिवस (जानेवारी 1, 2021 पासून कॅलेंडर दिवस) |
कामकाजाचे दिवस - भावी (प्रॉस्पेक्टिव) - सप्टेंबर 30, 2021 पर्यंत. |
(3) |
प्राधिकृत प्रदान प्रणाली ऑपरेटर्सनी (पीएसओ), त्यांच्या संबंधित वित्तीय वर्षाच्या समाप्तीपासून दोन महिन्यांच्या आत, वार्षिक धर्तीवर, सीईआरटी - आयएन एमपॅनल्ड ऑडिटर्सनी, किंवा इंफर्मेशन सिस्टिम्स ऑडिट अँड कंट्रोल असोशिएशनकडे पंजीकृत झालेल्या प्रमाणित इंफर्मेशन सिस्टिम ऑडिटरने, किंवा इंस्टिटपुट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या इंफर्मेशन सिस्टिम ऑडिटमध्ये डिप्लोमाधारकाने केलेल्या सिस्टिम ऑडिटरचा रिपोर्ट देणे आवश्यक आहे. |
मे 31, 2021 पर्यंत. |
सप्टेंबर 30, 2021 पर्यंत. |
(4) |
पीए सेवा देणा-या विद्यमान अबँकीय संस्था, जून 30, 2021 पूर्वी प्राधिकृततेसाठी अर्ज करतील. |
जून 30, 2021 पर्यंत. |
सप्टेंबर 30, 2021 पर्यंत * |
*प्रदान प्रणाली देणारांना व त्यात सहभागी होणारांना मार्च 17, 2020 च्या परिपत्रकाच्या परिच्छेद 7.4 व 10.4 मधील तरतुदींचे पालन करण्यास एक कार्यकारी इलाज/उत्तर तयार करण्यासाठी साह्य करण्यासाठी परिपत्रक सीओ.डीपीएसएस.पीओएलसी.क्र.एस33/02-14-008/2020-2021 दि. मार्च 31, 2021 अन्वये दिलेल्या विस्तारावर/मुदत वाढीवर परिणाम होणार नाही. |
|