आरबीआय/2021-22/46
डीओआर.एसटीआर.आरईसी.20/21.04.048/2021-22
जून 04, 2021
सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश)
सर्व प्राथमिक (शहरी) सहकारी बँका / राज्य सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
सर्व अखिल भारतीय वित्तीय संस्था
सर्व अबँकिय वित्तीय कंपन्या (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह)
महोदय/महोदया,
द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - 2.0 – व्यक्ती व लघु व्यवहारांच्या कोविड-19 संबंधित ताणतणावाचे द्रवीकरण – एकुण एक्सपोझर साठीच्या मर्यादेत सुधारणा
“द्रवीकरण साचा 2.0 – व्यक्ती व लघु व्यवहारांच्या कोविड-19 संबंधित ताणतणावाचे द्रवीकरण” वरील परिपत्रक डीओआर.एसटीआर.आरईसी.11/21.04.048/2021-22 दि. मे 5, 2021 चा संदर्भ घेण्यात यावा
2. वरील परिपत्रकाच्या खंड 5 अनुसार, ह्या साचाखाली द्रवीकरण करण्याबाबत विचारात घेता येऊ शकतील असे पात्र असलेले कर्जदार विहित करण्यात आले आहेत. त्यात पुढील उपखंड समाविष्ट आहेत.
ब) व्यापार / व्यवसायासाठी कर्जे व अग्रीम राशी घेतल्या आहेत. व ज्यांच्याबाबत कर्ज देणा-या संस्थेचे एकुण एक्सपोजर, मार्च 31, 2021 रोजी रु 25 कोटी पेक्षा जास्त नाही अशा व्यक्ती.
क) मार्च 31, 2021 रोजी एमएसएमई म्हणून वर्गीकृत केलेले सोडून, मार्च 31, 2021 रोजी ज्यांच्याबाबत कर्जदायी संस्थांना रु. 25 कोटीपर्यंतचे एक्सपोझर्स असलेले व घाऊक तसेच फुटकळ व्यापार करत असलेल्यांसह छोटे व्यापार व्यवसाय.
3. पुनरावलोकनावर आधरित, ही मर्यादा रु 25 कोटींपासून रु 50 कोटी पर्यंत वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे.
4. ह्या परिपत्रकाच्या इतर तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही.
आपला विश्वासु,
(मनोरंजन मिश्रा)
मुख्य महाव्यवस्थापक |