Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ���E�ɴɽ�ɮ�
 Sɱ�x�
 ���n����� Sɱ�x�
 �ɮ�E�ɮ�� ����J�� ���V�ɮ�{��`�
 Bx� ��� B�� ���V�
 |�n��x� |�h�ɱ��
����� >> B�� B C���V� - Display
Date: 28/04/2020
एनईएफटी प्रणाली

(एप्रिल 28, 2020 नुसार अद्यावत केल्याप्रमाणे)

(1) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण (एनईएफटी) प्रणाली म्हणजे काय ?

उत्तर :- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण (एनईएफटी) ही, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मालकीची व कार्यान्वित केलेली, देशभरातील केंद्रीकृत प्रदान प्रणाली आहे. ह्या प्रणालीत भाग घेणा-या निरनिराळ्या स्टेकहोल्डर्सकडून अनुसारण्यात येणा-या कार्यकृती आरबीआयच्या वेबसाईटवरील https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/NEFPG300411.pdf ह्या लिंकवर उपलब्ध आहेत.

(2) एनईएफटी प्रणाली वापरण्याचे लाभ कोणते ?

उत्तर :- निधी हस्तांतरण किंवा प्राप्त करण्यासाठी एनईएफटी पुढील लाभ देऊ करते.

  • वर्षामधील सर्व दिवसांसाठी दिवसरात्र उपलब्धता

  • लाभार्थींच्या खात्यात जवळजवळ त्याच वेळी सुरक्षित रितीने निधी हस्तांतरण व समायोजन.

  • सर्व प्रकारच्या बँकांच्या शाखांच्या मोठ्या नेटवर्कमार्फत भारतभर व्याप्ती.

  • लाभार्थींच्या खात्यात जमा झाल्यावर, एसएमएस/ई-मेल द्वारे प्रेषकाला सकारात्मक दुजोरा.

  • व्यवहार क्रेडिट होण्यास विलंब किंवा व्यवहार मागे/परत फिरल्यास दंडात्मक व्याजाची तरतुद.

  • बँकांवर आरबीआयकडून कोणतेही आकार नाहीत.

  • ऑनलाईन एनईएफटी व्यवहारांसाठी, बचत खाते ग्राहकांना कोणतेही आकार लागु नाहीत.

  • निधी हस्तांतरणाच्या व्यतिरिक्त, एनईएफटी प्रणालीचा उपयोग अनेक प्रकारच्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. जसे - क्रेडिट कार्डांची थकबाकीचे कार्ड देणा-या बँकांना प्रदान करणे, कर्जाच्या ईएमआयचे प्रदान, अंतर्गत विदेशी मुद्रा प्रेषणे इत्यादि.

  • भारतामधून नेपाळमध्ये असे एकेरी निधी हस्तांतरण करण्यास

(3) एनईएफटी प्रणालीचे कार्य कसे चालते ?

पायरी 1: एनईएफटीमार्फत निधी हस्तांतरण करु इच्छिणाऱ्या व्यक्त्ति/संस्था/कॉर्पोरेट कंपन्यांना एक अर्ज फॉर्म भरावा लागतो व त्यात लाभार्थीची माहिती (लाभार्थीचे नाव, लाभार्थीचे खाते असलेल्या बँक शाखेचे नाव, लाभार्थी बँकेचा आयएफएससी, खात्याचा प्रकार व खाते क्रमांक). हा अर्जाचा फॉर्म, प्रारंभ करणाऱ्या बँके शाखेकडे उपलब्ध असतो. प्रेषक त्याच्या/तिच्या बँक शाखेला त्याच्या खात्यातून डेबिट करण्यास प्राधिकृत करतो आणि विहित रक्कम लाभार्थीला पाठवितो. बँकर्सनी नेट बँकिंग सुविधा दिलेले ग्राहक तर निधि हस्तांतरण विनंती ऑनलाईन करु शकतात. काही बँका एटीएमद्वारा एनईएफटी सुविधा देऊ करतात. तथापि, आगंतुक ग्राहकांना मात्र, त्या बँकशाखेला त्यांची संपर्कमाहिती (संपूर्ण पत्ता व टेलिफोन नंबर) द्यावी लागते. लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यास किंवा कोणत्याही कारणाने तो व्यवहार फेटाळला/परत केला गेल्यास ग्राहकाला ते पैसे परत करण्यासाठी हे आवश्यक आहे.

पायरी 2: प्रारंभ करणारी बँकशाखा एक संदेश तयार करते व तो संदेश तिच्या पूलिंग सेंटरकडे (ह्याला एनईएफटी सेवा केंद्र असेही म्हणतात) पाठविते.

पायरी 3: हे पूलिंग केंद्र तो संदेश, एनईएफटी समाशोधन केंद्राकडे, (रिझर्व्ह बँक, मुंबई ह्यांच्या राष्ट्रीय समाशोधन कक्षद्वारा चलित) पुढील उपलब्ध बॅच मध्ये समाविष्ट करण्यासाठी पाठविते.

पायरी 4: समाशोधन केंद्र, निधी हस्तांतरण व्यवहारांना, डेस्टिनेशन बँक-निहाय वेगवेगळे करते आणि प्रारंभ करणाऱ्या बँकांमधून निधी मिळविण्यासाठी (डेबिट) एक लेखा विवरणपत्र तयार करते आणि ते निधी डेस्टिनेशन बँकांना देते (क्रेडिट). त्यानंतर, डेस्टिनेशन बँकांना, त्यांच्या पूलिंग केंद्रामार्फत (एनईएफटी सेवा केंद्र) बँक-निहाय प्रेषण संदेश पाठविले जातात.

पायरी 5: डेस्टिनेशन बँकांना समाशोधन केंद्राकडून अंतर्गत प्रेषण संदेश मिळतात आणि त्यानुसार लाभार्थीच्या खात्यात निधी जमा केला जातो.

(4) आयएफएससी म्हणजे काय?

उत्तर: आयएफएससी किंवा इंडियन फायनान्शियल सिस्टिम कोड हा एक अंक-अक्षरांचा संकेत (अल्फा न्युमरिक कोड) असून तो, एनईएफटी प्रणालीमध्ये भाग घेणाऱ्या बँकशाखेची ओळख नेमकेपणाने पटवितो. हा 11 अंकी संकेत असून त्यातील प्रथम चार अक्षरे बँकेबाबत असतात आणि शेवटचे 6 अंक शाखा दर्शवितात. 5 वा अंक हा शून्य (0) असतो. एनईएफटी प्रणालीद्वारे आयएफएससीचा उपयोग, डेस्टिनेशन बँका/शाखा ह्यांचेकडे संदेश पाठविण्यासाठी केला जातो.

(5) एखाद्या बँक शाखेचा आयएफएससी कसा शोधायचा?

उत्तर: एनईएफटीमध्ये भाग घेणाऱ्या सर्व बँकशाखांकडे बँकनिहाय आयएफएससीची यादी उपलब्ध आहे. तसेच त्यांचा आयएफएससी, रिझर्व्ह बँकेच्या, https://www.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=2009. ह्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. बँकांच्या शाखांनी त्यांच्या ग्राहकांना दिलेल्या चेकबुकच्या पानांवर हा आयएफएससी छापण्याबाबत सर्व बँकांना सांगण्यात आले आहे. नेट बँकिंगच्या ग्राहकांसाठी, अनेक बँकांनी, ऑन लाईन सर्च मध्ये डेस्टिनेशन बँकशाखेचा आयएफएससी एकदम समोर येण्यासारखा (पॉप अप) टाकला आहे.

(6) निधी हस्तांतरण/प्राप्तीसाठी एनईएफटी प्रणालीचा कोण कोण उपयोग करु शकतात ?

उत्तर :- एनईएफटी प्रणालीमध्ये भाग घेणा-या कोणत्याही सभासद बँकेत खाती ठेवणा-या व्यक्ती, संस्था व कॉर्पोरेट्स, एनईएफटी प्रणालीत भाग घेणा-या देशातील इतर कोणत्याही बँकेत खाते असलेल्या व कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा कॉर्पोरेटकडे, इलेक्ट्रॉनिक रितीने निधी हस्तांतरण करु शकतात.

एनईएफटीमध्ये भाग घेणा-या बँक-निहाय शाखांची यादी आरबीआयच्या वेबसाईटवर http://www.rbi.org.in/scripts/neft.aspx येथे उपलब्ध आहे.

(7) एनईएफटीचा वापर करुन पाठविण्याच्या निधीवर मर्यादा आहेत काय ?

उत्तर: नाही. एनईएफटीद्वारे निधी हस्तांतरणाच्या रकमेवर, किमान किंवा कमाल अशा कोणत्याही मर्यादा नाहीत. तथापि, बँका त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीने व त्यांच्या जोखीम दृष्टीकोनानुसार रकमेबाबत मर्यादा ठरवू शकतात.

(8) बँक खाते नसलेल्या व्यक्तींकडूनही निधी पाठविण्यासाठी एनईएफटी प्रणाली वापरता येऊ शकते काय ?

उत्तर :- होय. कोणतेही बँक खाते नसलेली व्यक्ती, एनईएफटीचे सभासद असलेल्या दुस-याच बँकेत बँक खाते असलेल्या लाभार्थीला एनईएफसीमार्फत निधी पाठवू शकते. संपूर्ण पत्ता, टेलिफोन क्रमांक इत्यादि अतिरिक्त तपशील देऊन, जवळच्या एनईएफटीयुक्त बँकेत रोख रक्कम जमा करुन हे करता येते. तथापि, असे रोख रक्कम प्रेषण करणे प्रति व्यवहार रु.50,000 पर्यंतच निर्बंधित आहे.

(9) एनईएफटी प्रणालीमार्फत मी विदेशातील माझ्या नातलगाला/मित्राला निधी पाठवू शकतो काय ?

उत्तर :- एनईएफटीद्वारे देशाबाहेर करावयाची प्रेषणे, इंडो-नेपाळ प्रेषण योजनेखाली केवळ नेपाळ मध्येच करण्यास परवानगी आहे. ह्या योजनेखाली, नेपाळमधील लाभार्थींचे नेपाळ मधील खाते असले किंवा नसले तरीही, प्रेषण करणारी व्यक्ती भारतामधील कोणत्याही एनईएफटी सक्षम बँक शाखेतून नेपाळला निधीचे हस्तांतरण करु शकते. लाभार्थीला नेपाळी रुपयांमध्ये निधी मिळेल. ह्या इंडो-नेपाळ प्रेषण सुविधा योजनेचा तपशील आरबीआयच्या वेबसाईटवर https://rbi.org.in/scripts/FAQView.aspx?Id=67 उपलब्ध आहे.

(10) एनईएफटीचे कामकाजाचे तास कोणते ?

उत्तर :- संपूर्ण वर्षातील सर्व दिवशी, रात्रंदिवस म्हणजे, 24 x 7 x 365 धर्तीवर ही एनईएफटी प्रणाली उपलब्ध आहे. सध्या, दिवसभरात, अर्धा-अर्धा तास मध्यंतराच्या बॅचेसमध्ये एनईएफटी कार्यरत असते. कोणत्याही कारणाने एनईएफटी उपलब्ध नसल्यास, सर्व प्रणाली सहभागींना आरबीआयकडून सुयोग्य संदेश पाठविला जाईल.

(11) एनईएफटी प्रणालीमधून निधी प्रेषणासाठी आवश्यक तपशील कोणता ?

उत्तर :- लाभार्थीच्या ओळखीसाठी मूलभूत माहिती म्हणजे :

लाभार्थीचे नाव
लाभार्थीच्या शाखेचे नाव
लाभार्थीच्या बँकेचे नाव
लाभार्थीच्या अकाउंट चा टाईप
लाभार्थीचा अकाउंट नंबर
लाभार्थीच्या शाखेचा आयएफसी कोड

(12) एनईएफटी व्यवहारांसाठी बँकेकडून कोणते ग्राहक आकार लावले जातात ?

उत्तर :- एनईएफटी व्यवहारांसाठी आरबीआय सभासद बँकांकडून कोणतेही आकार लावत नाही. तसेच लाभार्थी खात्यांना क्रेडिट देण्यासाठी, डेस्टिनेशन बँक शाखांमधील अंतर्गत/आवक व्यवहारांसाठीही कोणतेही आकार नाहीत.

बाह्य व्यवहारांसाठीच्या एनईएफटी व्यवहारांसाठी त्यांच्या ग्राहकांना बँकेने लावावयाचे कमाल आकार पुढीलप्रमाणे आहेत.

(अ) जानेवारी 1, 2020 पासून ऑनलाईन केलेल्या व्यवहारांसाठी, बचत बँक खाते धारकांना एनईएफटी निधी हस्तांतरणासाठी कोणतेही आकार न लावण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.

(ब) ओरिजिनेटिंग बँकेत, इतर व्यवहारांसाठीच्या बाह्य व्यवहारांसाठी आकारावयाचे कमाल आकार पुढीलप्रमाणे आहेत:

- रु.10,000 पर्यंतचे व्यवहार रु.2.50 पेक्षा जास्त नाही (+ लागु असलेला जीएसटी).

- रु.10,000 पेक्षा जास्त व रु.1 लाख पर्यंतचे व्यवहारांसाठी : रु. 5 पेक्षा अधिक नाही (+ लागु जीएसटी).

- रु.1 लाख पेक्षा अधिक ते रु.2 लाख पर्यंतचे व्यवहारांसाठी : रु.15 पेक्षा अधिक नाही (+ लागु जीएसटी)

- रु. 2 लाख पेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी : रु.25 पेक्षा अधिक नाही (+ लागु जीएसटी)

(क) इंडो-नेपाळ प्रेषण सुविधा योजनेखाली, एनईएफटी प्रणालीचा वापर करुन भारतामधून नेपाळमध्ये निधी हस्तांतरण करण्यासाठी लागु असलेले आकार https://rbi.org.in/scripts/FAQView.aspx?Id=67 ह्या आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

(13) एनआरई व एनआरओ खात्यात/खात्यांमधून निधी हस्तांतरण करण्यासाठी मी एनईएफटी वापरु शकतो काय ?

उत्तर :- होय. देशामधील एनआरई व एनआरओ खात्यात/खात्यामधून निधी हस्तांतरणासाठी एनईएफटी वापरता येऊ शकते. तथापि, त्यासाठी विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 2000 च्या (फेमा) तरतुदी व वायर ट्रान्स्फर मार्गदर्शक तत्वे ह्यांचे अनुसरण केले जाणे आवश्यक आहे.

(14) दुस-याच एखाद्या खात्यामधून निधी काढण्यासाठी/मिळविण्यासाठी मी एनईएफटी व्यवहार सुरु करु शकतो काय ?

नाही. एनईएफटी ही एक क्रेडिट-पुश प्रणाली आहे - म्हणजे केवळ लाभार्थीला निधी प्रदान/हस्तांतरण/प्रेषण करण्यासाठीच प्रदानकर्ता/प्रेषक/प्रेषण करणारा व्यवहार सुरु करु शकतो.

(15) सुरु केलेल्या एनईएफटी व्यवहारांच्या स्थितीचा मागोवा मला कसा घेता येईल ? एनईएफटी व्यवहाराची स्थिती समजण्यासाठी कुणाकडे जावे ?

उत्तर :- प्रेषणकर्ता व लाभार्थी त्या एनईएफटी व्यवहाराच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी अनुक्रमे त्यांच्या बँकेच्या एनईएफटी ग्राहक साह्य केंद्राशी संपर्क करु शकतात. एनईएफटी ग्राहक सहाय्य केंद्राचा तपशील संबंधित बँकांच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो. सभासद बँकांच्या ग्राहक सहाय्य केंद्रांचा तपशील https://www.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=2070 येथे आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

व्यवहाराचा जलद मागोवा घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या बँकेला, युनिक ट्रॅझँक्शन रेफरन्स (युटीआर) नंबर/व्यवहार संदर्भ क्रमांक, व्यवहाराची तारीख ह्यासारखा, व्यवहाराशी संबंधित तपशील देणे आवश्यक आहे.

(16) आरबीआयमधील हेल्पडेस्क/काँट्रॅक्ट पॉईंट म्हणजे काय ?

उत्तर :- आरबीआयच्या एनईएफटी हेल्पडेस्क/काँट्रॅक्ट पॉईंटशी तुम्ही पुढील पत्त्यावर संपर्क करु शकता :-

एनईएफटी हेल्पडेस्क (किंवा ग्राहक सहाय्य केंद्र) आरबीआय प्रायमरी डेटा सेंटर (पीडीसी), आरबीआय, सीबीडी, बेलापुर, नवी मुंबई, महाराष्ट्र - 410210.

(17) लाभार्थीला निधी हस्तांतरण होण्यासाठी किती वेळ अपेक्षित आहे ?

उत्तर :- बॅच सेटलमेंट झाल्यापासून दोन तासांपर्यंत लाभार्थीच्या खात्यात क्रेडिट होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.

(18) लाभार्थीला निधी हस्तांतरित/क्रेडिट न झाल्यास काय होते ? किंवा निरनिराळ्या कारणांनी, लाभार्थीकडे निधी क्रेडिट न झाल्यास मला माझे पैसे परत मिळतात काय ?

उत्तर :- कोणत्याही कारणाने लाभार्थीच्या खात्यात क्रेडिट न झाल्यास, त्या व्यवहाराची ज्यात प्रक्रिया झाली होती ती बॅच पूर्ण झाल्याच्या दोन तासांच्या आत, डेस्टिनेशन बँकांनी तो व्यवहार (ओरिजिनेटिंग बँकेला) परत करणे आवश्यक असते.

(19) विलंबाने दिलेले क्रेडिट किंवा निधी परत केला जातो ह्यासाठी लाभार्थी बँकेला लागु असलेला दंड/भरपाई कोणती ?

बॅच समायोजना नंतर दोन तासांच्या आत व्यवहार क्रेडिट न झाल्यास किंवा परत न केला गेल्यास, विलंब कालासाठी किंवा क्रेडिट किंवा परतल्याच्या तारखेपर्यंत - असेल त्यानुसार बँकेने बाधित ग्राहकाला, त्याने ह्याबाबत तक्रार/विशिष्ट दावा दाखल केला नसल्यासाठी, आरबीआय एलएएफ विद्यमान रेपो रेट अधिक दोन टक्के दराने दंडात्मक व्याज देणे आवश्यक आहे.

(20) लाभार्थीचा खाते क्रमांक चुकीचा दिला गेल्यास काय होईल ?

उत्तर :- प्रेषणर्कत्याने दिलेल्या अर्जात/सूचनेत लिहिलेल्या/दिलेल्या खाते क्रमांकालाच क्रेडिट दिले जाते. केवळ ह्या खाते क्रमांकावर आधारित लाभार्थीच्या खात्यात क्रेडिट दिले जात असते. सुयोग्य खाते क्रमांक लिहिण्याची जबाबदारी ही केवळ प्रेषक ग्राहकाचीच आहे. एनईएफटी प्रेषण सूचना/अर्जात लाभार्थीचा सुयोग्य खाते क्रमांक लिहिण्याची काळजी, प्रेषणकर्ता/ओरिजिनेटरने घ्यावी.

(21) एनईएफटी व्यवहारासंबंधाने तक्रार/वाद असल्यास मी कुणाकडे जावे ?

उत्तर :- वाद्ग्रस्त व्यवहाराच्या तपशीलासह तुमच्या बँकेच्या तक्रार निवारण केंद्राकडे जावे. तुमच्या तक्रारीचे निवारण 30 दिवसांच्या आत न झाल्यास, आरबीआयच्या बँकिंग लोकपाल योजना 2006 खाली बँकिंग लोकपालाकडे बीओंचा संपर्क तपशील व कार्यक्षेत्रे, https://rbi.org.in/Scripts/AboutUsDisplay.aspx?pg=BankingOmbudsmen.htm येथे आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��