Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ���E�ɴɽ�ɮ�
 Sɱ�x�
 ���n����� Sɱ�x�
 �ɮ�E�ɮ�� ����J�� ���V�ɮ�{��`�
 Bx� ��� B�� ���V�
 |�n��x� |�h�ɱ��
����� >> B�� B C���V� - Display
Date: 30/08/2019
एनबीएफसी/एचएफसी ह्यांचेकडून उच्च दराचे पूल्ड अॅसेट खरेदी करण्यासाठी, जी ओआयने, पीएसबींना देऊ केलेली अंशात्मक कर्ज हमी योजना

वित्तीय दृष्ट्या सुदृढ अशा अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी)/गृह वित्त कंपन्या (एचएफसी) ह्यांचेकडून उच्च दराचे पूल्ड अॅसेट्स खरेदी करण्यास, भारत सरकारने, त्यांची अधिसूचना दि. ऑगस्ट 10, 2019 अन्वये, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (पीएसबी) देऊ केलेली अंशात्मक कर्ज हमी वरील नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

(1) भारत सरकारच्या अंशात्मक कर्ज हमी (पीसीजी) योजनेखाली, सिक्युरिटायझेशन व्यवहार आणि/किंवा थेट असाइनमेंटद्वारे अॅसेट्सचे हस्तांतरण असलेले व्यवहार येतात काय ?

उत्तर :- ही योजना, थेट असाइनमेंटद्वारे अॅसेट्सचे हस्तांतरण असलेल्या व्यवहारांसाठी लागु आहे.

(2) थेट असाईनमेंट व्यवहारांसाठी विहित केलेल्या किमान धारण कालावधी (एमएचपी) किमान ठेवण्याच्या आवश्यकता (एमआरआर) वरील मार्गदर्शक तत्वे ह्या योजनेला लागु आहेत काय ?

उत्तर :- पीसीजी योजनेखालील व्यवहारांसाठी एमएचपी व एमआरआर आवश्यकता लागु नाहीत.

(3) ह्या योजनेखाली उपलब्ध करण्यात आलेल्या पूल्ड अॅसेट्ससाठी, सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसी, कर्ज वाढ (क्रेडिट एनहान्समेंट) देऊ शकतो काय ?

उत्तर :- होय. सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफना कर्ज वाढ देऊ शकतात. तथापि, अशा कर्ज वाढीसाठी, त्यांनी, ह्या बँकेने, एनबीएफसी/एचएफसीसाठी विहित केलेल्या भांडवली आवश्यकतानुसार भांडवल ठेवणे आवश्यक आहे.

(4) आरबीआयच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वांनुसार असलेल्या आवश्यकता पूर्ण न करणा-या एनबीएफसी/एचएफसींना जणु काही ते अॅसेट्स, सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसीच्या पुस्तकांमध्ये अजूनही आहेत म्हणून विकलेल्या अॅसेट्ससाठी भांडवल ठेवावे लागेल काय ?

उत्तर :- नाही. भारत सरकारची अधिसूचना दि. ऑगस्ट 10, 2019 मध्ये विहित केल्यानुसार, आणि येथे दिलेली स्पष्टीकरणे ह्यांना अनुसरुन, पीसीजी योजनेखाली असलेले व्यवहार ह्यांनी विक्रीबाबतचे खरे निकष पूर्ण केले असल्याचे समजले जाईल आणि सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसी ह्यांना, सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसीने कर्ज वाढ उपलब्ध केली असल्याची प्रकरणे सोडल्यास, खरेदीदार पीएसबींना पूल्ड अॅसेट्सचे हस्तांतरण केल्यानंतर कोणतेही भांडवल ठेवणे गरजेचे नाही.

(5) ह्या पीसीजी योजनेखाली हस्तांतरित केलेले अॅसेट्स, सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसी पुनः खरेदी करु शकतात काय ?

उत्तर :- होय. सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसी ह्यांना, प्रथम नकार धर्तीवर (र्फस्ट रेफ्युजल बेसीस) विहित केलेल्या 12 महिन्यांच्या कालानंतर, पुनर् खरेदी व्यवहार म्हणून, त्यांचे अॅसेट्स पुनः/परत विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

(6) सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसींनी, विहित केलेल्या 12 महिन्यांच्या कालावधीनंतर, प्रथम नकार धर्तीवरील हक्काने, एक पुनर् खरेदी व्यवहार म्हणून त्यांचे अॅसेट्स पुनः/परत खरेदी केल्यास, ह्या पुनश्च खरेदी केलेल्या अॅसेट्ससाठी भांडवल ठेवणे त्यांना आवश्यक आहे काय ?

उत्तर :- होय. पीसीजी योजनेखाली अॅसेट्स पुनश्च/परत विकत घेतल्यास, सुरुवात करणा-या एनबीएफसी/एचएफसीने, ह्या बँकेने एनबीएफसी/एचएफसीसाठी विहित केलेल्या भांडवली आवश्यकतांनुसार, पुनः खरेदी केलेल्या अॅसेट्ससाठी भांडवल ठेवणे आवश्यक आहे.

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��