Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ���E�ɴɽ�ɮ�
 Sɱ�x�
 ���n����� Sɱ�x�
 �ɮ�E�ɮ�� ����J�� ���V�ɮ�{��`�
 Bx� ��� B�� ���V�
 |�n��x� |�h�ɱ��
����� >> B�� B C���V� - Display
Date: 01/01/2020
ट्रेड रिसिव्हेबल्स डिसकाऊंटिंग सिस्टिम (ट्रेड्स-टीआरईडीएस)

(जानेवारी 1, 2020)

(1) ट्रेड रिसिव्हेबल्स डिसकाऊंटिंग सिस्टिम (टीआरईडीएस) म्हणजे काय ?

उत्तर : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) ट्रेड रिसिव्हेबल्स (म्हणजे व्यापारातील येणे रक्कम) चे वित्तसहाय्य/डिसकाऊंटिंग करण्यासाठी बहुविध धनकोंमार्फत सहाय्य करणारा ट्रेड्स हा एक इलेक्ट्रॉनिक मंच आहे. अशी रक्कम (रिसिव्हेबल्स), कॉर्पोरेट्स व इतर खरेदीदार - सरकारी विभाग व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयु) ह्यांच्याकडूनही येणे असू शकते.

(2) ट्रेड्स मधील सहभागी कोणते ?

उत्तर : ट्रेड्स मंचावर, विक्री करणारे, खरेदीदार व वित्तपुरवठा करणारे हे सहभागी असतात.

(3) ट्रेड्स मध्ये विक्रेता म्हणून कोण भाग घेऊ शकते ?

उत्तर : ट्रेड्समध्ये विक्रेते म्हणून केवळ एमएसएमईच भाग घेऊ शकतात.

(4) ट्रेड्समध्ये खरेदीदार म्हणून कोण भाग घेऊ शकते ?

उत्तर : कॉर्पोरेट्स, सरकारी विभाग, पीएसयु व अन्य कोणतीही संस्था खरेदीदार म्हणून भाग घेऊ शकते.

(5) वित्तपुरवठा करणारा (धनको) म्हणून ट्रेड्समध्ये कोण भाग घेऊ शकतो ?

उत्तर : बँका, एनबीएफसी, - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) परवानगी दिलेल्या फॅक्टर्स व इतर वित्तीय संस्था ट्रेड्समध्ये धनको म्हणून भाग घेऊ शकतात.

(6) ट्रेड्सचे कार्य कसे चालते ?

उत्तर : ट्रेड्सद्वारा वित्तसहाय्य/डिसकाऊंटिंग करतेवेळी स्थूलमानाने पुढील पाऊले/पाय-या असतात :

(1) फॅक्टरिंग युनिटची (एफयु) निर्मिती - ट्रेड्समध्ये, इनव्हॉईसेस किंवा बिल्स ऑफ एक्सचेंज ह्यासाठी एफयु हे प्रमाणभूत नाव आहे - आणि ह्यात, ट्रेड्स मंचावर एमएसएमई विक्रेत्याने (फॅक्टरिंगच्या बाबतीत) किंवा खरेदीदाराने (रिव्हर्स फॅक्टरिंगच्या बाबतीत) दिलेल्या, इनव्हॉईसेस/बिल्स ऑफ एक्सचेंज (एमएसएमई विक्रेत्यांनी खरेदीदारांना माल/सेवा विकल्याचा पुरावा) चा तपशील असतो.

(2) प्रतिपक्षाने खरेदीदार किंवा विक्रेता असेल त्यानुसार - केलेला एफयुचा स्वीकार.

(3) धनकोंकडून बोली लावली जाणे.

(4) विक्रेता किंवा खरेदीदार (असेल त्यानुसार) ह्यांच्याकडून सर्वोत्तम बोलीची निवड केली जाणे.

(5) वित्तसहाय्य/डिसकाऊंटिंगच्या सहमत दराने धनकोने (निवडलेल्या बोलीच्या), एमएसएमई विक्रेत्याला केलेले प्रदान.

(6) खरेदीदाराने धनकोला ठरलेल्या तारखेस प्रदान करणे.

(7) फॅक्टरिंग युनिट (एफयु) म्हणजे काय ?

उत्तर : फॅक्टरिंग युनिट (एफयु) हे इनव्हॉईसेस/बिल्स ऑफ एक्सचेंज ह्यासाठी ट्रेड्समध्ये वापरण्यात येणारे प्रमाणभूत नामाभिधान आहे. प्रत्येक एफयु हे, सरकारी विभाग व पीएसयु ह्यासह कॉर्पोरेट्स किंवा इतर खरेदीदार ह्यांचे एक निश्चित असे दायित्व असते.

(8) एफयु कोण निर्माण करु शकते ?

उत्तर : ट्रेड्समध्ये, एमएसएमई विक्रेता किंवा खरेदीदार ह्यांच्याकडून एफयु निर्माण केले जाऊ शकते. ते एमएसएमई विक्रेत्याने निर्माण केल्यास त्या प्रक्रियेला फॅक्टरिंग म्हटले जाते. परंतु ते कॉर्पोरेट्स किंवा अन्य खरेदीदारांनी निर्माण केल्यास तिला रिव्हर्स फॅक्टरिंग म्हटले जाते.

(9) ट्रेड्स, रिव्हर्स फॅक्टरिंगही हाताळू शकते काय ?

उत्तर : होय. ट्रेड्समध्ये रिसीव्हेबल्स फॅक्टरिंग तसेच रिव्हर्स फॅक्टरिंग ह्या दोन्हीही प्रक्रिया केल्या जाऊ शकतात.

(10) खरेदीदाराने परतफेड करण्यात कसुरी केल्यास एमएसएमई विक्रेत्याने धनकोला पैसे द्यावे लागतील काय ?

उत्तर : नाही. ट्रेड्सखाली प्रक्रिया केलेले व्यवहार, एमएसएमईसाठी "विदाऊट रिकोर्स" असतात.

(11) ट्रेड्स मंच स्थापन करुन चालविण्यासाठी काही प्राधिकृतता घ्यावी लागते काय ?

उत्तर : होय. प्रदान व समायोजन प्रणाली (पीएसएस) अधिनियम 2007 खाली आरबीआयकडून प्राधिकृतता घेणे आवश्यक आहे.

(12) ट्रेड्स स्थापन करुन चालविण्यासाठी असलेले पात्रता निकष कोणते ?

उत्तर : ट्रेड्स मंच स्थापन करुन चालविण्यासाठीचे पात्रता निकष, आरबीआयने ट्रेड्ससाठी दिलेल्या (वेळोवेळी सुधारित केलेल्या) मार्गदर्शक तत्वांमध्ये दिले आहेत. ही मार्गदर्शक तत्वे पुढील मार्गावर उपलब्ध आहेत www.rbi.org.in → “Payment and Settlement Systems” dropdown → “Guidelines ह्याबाबत आरबीआयचे ऑक्टोबर 15, 2019 चे वृत्तपत्र निवेदनही वाचता येईल. व ते पुढील वेब लिंकवर अॅक्सेस करता येईल : https://www.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3504 आणि https://www.rbi.org.in/scripts/FS_PressRelease.aspx?prid=48405&fn=9.

(13) आरबीआयने प्राधिकृत केलेल्या ट्रेड्स संस्थांचा तपशील कुठे मिळू शकेल ?

उत्तर : ट्रेड्ससह, सर्व प्राधिकृत प्रदान प्रणाली ऑपरेटर्सची (पीएसओ) यादी पुढील मार्गावर उपलब्ध आहे : : www.rbi.org.in → “Payment and Settlement Systems” dropdown → “Information Useful to Customer” → “List of Authorised Entities – Payment System Operators ती अॅक्सेस करण्यासाठी पुढील वेब लिंक आहे https://www.rbi.org.in/Scripts/PublicationsView.aspx?id=12043

(14) ट्रेड्स संस्था त्यांच्या सहभाग्यांचे केवायसी (तुमचा ग्राहक जाणा) करतात काय ?

उत्तर : होय. ट्रेड्स संस्था, केवायसी प्रक्रिया करण्यासाठी, आरबीआयने दिलेल्या, (वेळोवेळी सुधारित केलेल्या) "महानिर्देश - तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्देश, 2016" दि. फेब्रुवारी 25, 2016 चे अनुसरण करतात.

(15) समायोजन फाईल म्हणजे काय आणि ती ट्रेड्समध्ये कोण निर्माण करते ?

उत्तर : एखादी समायोजन फाईल, एखाद्या विशिष्ट तारखेस/वेळी ड्यु असलेली किती रक्कम, सहभागींच्या (विक्रेते, खरेदीदार व धनको) ह्यांच्या खात्यामधून डेबिट करावयाची आहे व त्यांच्या खात्यात क्रेडिट करावयाची आहे ह्याची माहिती देते. दुस-या शब्दात, एखाद्या धनकोने एमएसएमई विक्रेत्याला किती पैसे द्यायचे आहेत व एखादा खरेदीदार त्याच्या धनकोला विशिष्ट तारखेस/वेळी किती देणे लागतो हे ही फाईल सांगते. ट्रेड्स संस्था ही समायोजन फाईल निर्माण करतात व ती फाईल विद्यमान प्रदान प्रणालींकडे पाठवितात (उदा. राष्ट्रीय स्वयंचलित समाशोधन सह).

(16) ट्रेड्स मंचावर केलेल्या कसुरी ही ट्रेड्स संस्थाची जबाबदारी असते काय ?

उत्तर : नाही. कसुरी हाताळणे हे ट्रेड्स मंचाच्या व्याप्तीच्या बाहेर आहे.

हे एफएक्यु, भारतीय रिझर्व्ह बँकेने (या पुढे ‘बँक’ म्हणून संबोधले जाईल) माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी दिले असून त्यांचा उल्लेख कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत/कारवाईत केला जाणार नाही व त्यांना कोणताही कायदेशीर हेतु असणार नाही. ह्यांच्या आधारावर केलेल्या कृती आणि/किंवा निर्णय ह्यासाठी रिझर्व्ह बँक जबाबदार असणार नाही. स्पष्टीकरणे किंवा अर्थ ह्यासाठी, रिझर्व्ह बँकेने व सरकारने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेण्याची विनंती वाचकाला करण्यात येत आहे.

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��