सर्वसाधारण सूचना
काँप्युटर सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञानयुक्त निर्यातीवरील (आयटीईएस) दरवर्षी, रिझर्व्ह बँकेसाठी करण्यात येणा-या सर्वेक्षणासाठी, अगदी अलिकडील वित्तीय वर्षाच्या मार्च अखेरीस असल्यानुसारची माहिती, सॉफ्टवेअर आणि आयटीईएस/बीपीओ/एलएलपी निर्यात कंपन्यांच्या काँप्युटर सॉफ्टवेअर वरील माहिती व आयटीयुक्त सेवा निर्यात मधून गोळा करण्यात येते.
ह्या सर्वेक्षणाचे परिणाम/निष्कर्ष, देशाच्या जमाखर्चाचा ताळेबंद (बीओपी) सांख्यिकी व इतर उपयोगाव्यतिरिक्त सार्वजनिक रितीने प्रसिध्द केले जातात.
गोपनीयतेचा खंड :- देण्यात आलेली कंपनी-निहाय माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि केवळ एकूण एकत्रित माहितीच रिझर्व्ह बँकेकडून वितरित केली जाईल.
सूचना :- प्रतिवादी कंपन्या/एलएलपी/मालकी कंपन्या ह्यांनी र्सव्हे शेड्युल, आरबीआयच्या वेबसाईटवर व वृत्तपत्र निवेदनात दिलेल्या एक्सेल फॉरमॅटमध्ये (*.xls) भरावे. र्सव्हे शेड्युल भरण्यापूर्वी सूचना पत्र (र्सव्हे शेड्युल मध्ये उपलब्ध) संपूर्णतः वाचावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.
महत्त्वाचे मुद्दे :- प्रतिवादी कंपन्या/एलएलपी/मालकी कंपन्या ह्यांनी खाली दिलेले मुद्दे वाचावेत :-
(1) कोणतेही मॅक्रोज नसलेल्या .xls फॉरमॅट मध्ये असलेल्या अगदी अलिकडील र्सव्हे शेड्युलचा उपयोग कंपनीने करावा.
(2) हे र्सव्हे शेड्युल केवळ एक्सेल 97-2003 वर्कबुकमध्ये, म्हणजे .xls फॉरमॅट मध्येच कंपनीने सेव्ह करणे आवश्यक आहे.
(3) र्सव्हे शेड्युल .xls फॉरमॅट मध्ये सेव्ह करण्यासाठी पुढील पाय-यांचे अनुसरण करावे.
(अ) Office Button / File → Save As → Save As type येथे पोहोचा
(ब) “Excel 97-2003 Workbook” सिलेक्ट करा आणि सर्व्हे शेड्युल .xls फॉरमॅट मध्ये सेव्ह करा.
(4) त्या कंपनीने, आरबीआयने दिलेल्या, .xls फॉरमॅट ह्या र्सव्हे शेड्युलचा वापर केलाच पाहिजे आणि ते सादर करतेवेळी त्या र्सव्हे शेड्युलमध्ये कोणतेही मॅक्रो न टाकण्याची विनंती करण्यात येत आहे.
(5) कृपया नोंद घ्यावी की अन्य कोणत्याही नमुन्यात (.xls फॉरमॅट सोडून अन्य) सादर केलेले र्सव्हे शेड्युल प्रणालीकडून आपोआपच फेटाळले जाईल.
(6) र्सव्हे शेड्युलमध्ये देण्यात आलेली माहिती संपूर्ण असावी व कोणतीही माहिती गाळण्यात आलेली नसावी.
(7) विभाग अ ते ड भरल्यानंतर, कंपनीने घोषणापत्र भरावयाचे आहे. कंपनीने दिलेली/भरलेली माहिती आरबीआयला सादर करण्यापूर्वी दोनदा तपासली जाण्यास व वैध करण्यास ह्या घोषणापत्राचे सहाय्य होते. ह्यामुळे डेटा एंट्रीच्या चुका, डेटा गाळला जाणे ह्यासारख्या चुका टाळण्यास मदत होते.
(8) प्रश्न क्रमांक 3 ते 9 मध्ये माहिती भरतेवेळी, [!@#$%^&*_()] सारखी चिन्हे व स्वल्पविराम ह्यांचा कृपया उपयोग न करण्याची विनंती करण्यात येत आहे.
(1) वर्षाच्या कोणत्या महिन्यात आरबीआयकडून आयटीईएस र्सव्हे सुरु केला जातो?
उत्तर :- मार्च अखेरीसच्या चालु/विद्यमान संदर्भ कालावधीसाठी, आरबीआय, जून मध्ये आयटीईएस र्सव्हे सुरु करते.
(2) ह्या आयटीईएस र्सव्हेची वारंवारता किती आहे?
उत्तर :- वार्षिक.
(3) आयटीईएस र्सव्हे सादर करण्यासाठीची कालरेषा कोणती?
उत्तर :- प्रतिवादी कंपन्या/एलएलपी/मालकी कंपन्या त्यांचे प्रतिसाद, हे सर्वेक्षण सुरु झाल्याच्या एक महिन्याच्या आत सादर करु शकतात.
(4) ह्या आयटीईएस र्सव्हेचा संदर्भ कालावधी किती असतो?
उत्तर :- एप्रिल वववव पासून ते मार्च वववव पर्यंतचे वित्तीय वर्ष.
(5) कंपनीचा लेखा समाप्तीचा कालावधी, संदर्भ कालावधीपेक्षा (मार्च अखेर) वेगळा असल्यास, ही माहिती लेखा समाप्ती कालावधीनुसार आम्ही रिपोर्ट करु शकतो काय?
उत्तर :- लेखा बंद करणे हे मार्च पेक्षा वेगळे असल्यास, ती कंपनी, लेखा बंद/समाप्तीच्या कालानुसार सादर करु शकत नाही. अशा बाबतीत, कंपनीच्या अंतर्गत मूल्यमापनानुसार, केवळ संदर्भ कालावधीसाठीचीच (मागील मार्च ते अलिकडील मार्च) माहिती कळविली जावी.
(6) आयटीईएस सर्वेक्षणात कोणत्या संस्था भाग घेऊ शकतात?
उत्तर :- काँप्युटर सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञानयुक्त सेवांची निर्यात करणा-या कंपन्या/एलएलपी/मालकी कंपन्या ह्या सर्वेक्षणात भाग घेऊ शकतात.
(7) संदर्भ कालावधीमध्ये काँप्युटर सॉफ्टवेअरची निर्यात करणा-या एलएलपी/मालकी कंपन्या ह्यांनी, आयटीईएस र्सव्हे शेड्युल सादर करणे आवश्यक आहे काय? होय असे असल्यास ते र्सव्हे शेड्युल सादर करण्याची कार्यरीत कोणती?
उत्तर :- सादर करण्याच्या पोर्टलमधील अॅक्सेस हा सीआयएन आधारित असल्याने, त्या वित्तीय वर्षाच्या मार्च अखेरीस असल्यानुसार काँप्युटर सॉफ्टवेअर निर्यात केली असलेल्या कोणत्याही एलएलपी/मालकी कंपनीने, itesquery@rbi.org.in वर रिक्वेस्ट मेल पाठवून डमी सीआयएन मिळविणे आवश्यक आहे. त्या कंपनीने आरबीआयकडून हा डमी सीआयएन घेतल्यावर, तो क्रमांक, आयटीईएस र्सव्हेसाठी एक्सेल (*.xls) फाईल सादर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
तथापि, एखाद्या संस्थेने मागील एखाद्या वेळी डमी सीआयएन नंबर मिळविला असल्यास, तिने विद्यमान राऊंडमध्येही त्याच सीआयएन क्रमांकाचा वापर करावा.
(येथे असेही सांगण्यात येते की, हे डमी सीआयएन क्रमांक, केवळ आयटीईएस शेड्युल भरण्यासाठीच आरबीआयकडून दिले जातात - अन्य कोणत्याही कामासाठी नाही.)
(8) ह्या सर्वेक्षणाखाली, व्यवसाय कार्यकृती वर्गीकरणावरील कोण-कोणती माहिती येते?
उत्तर :- काँप्युटर सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञान सेवांच्या चार मुख्य कार्यकृती त्यांच्या पोट वर्गीकरणासह र्सव्हे शेड्युलखाली येतात. ह्याबाबतचा तपशील र्सव्हे फॉर्ममध्येच दिला आहे.
(9) एखाद्या कंपनी/एलएलपी/मालकी संस्थेला संदर्भ काळात कोणतेही निर्यात उत्पन्न मिळाले नसल्यास त्यांनी ह्या सर्वेक्षणात भाग घेणे आवश्यक आहे काय?
उत्तर :- होय. कंपनी/एलएलपी/मालकी कंपनीला संदर्भ कालावधीत निर्यात उत्पन्न मिळाले नसून, आधी ते मिळाले असल्यास, तिने आयटीईएस र्सव्हेचा शून्य र्सव्हे शेड्युल सादर करावा.
(10) निर्यातीसाठी कोणती इनव्हॉईसिंग मुद्रा वळविली जावी?
उत्तर :- एकूण इनव्हॉईस मूल्य हे प्रत्यक्षातील भारतीय रुपयांमध्ये (आयएनआर) असावे (ह्यात संदर्भ कालावधीत, दुय्यम/सहाय्यक संस्थांना केलेले बिलिंग समाविष्ट असावे).
(11) निर्यात-प्रमुख मुद्रांमध्ये इनव्हॉईस मूल्यातील रिपोर्ट करण्यासाठीची मुद्रा कोणती?
उत्तर :- एकूण इनव्हॉईस मूल्य हे प्रत्यक्षातील भारतीय रुपयांमध्ये (आयएनआर) असावे (ह्यात संदर्भ कालावधीत, विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांना केलेले बिलिंग समाविष्ट असावे).
(12) निर्यात-प्रकारच्या सेवांमध्ये, इनव्हॉईस मूल्यातील रिपोर्ट करण्यासाठीची मुद्रा कोणती?
उत्तर :- एकूण इनव्हॉईस मूल्य हे प्रत्यक्ष भारतीय रुपयात (आयएनआर) असावे. (ह्यात, विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांना निर्यात सेवांच्या प्रकारानुसार केलेले बिलिंग समाविष्ट असावे).
(13) निर्यात-प्रमुख क्षेत्रांमध्ये इनव्हॉईस मूल्यातील रिपोर्ट करण्याची मुद्रा कोणती?
एकूण इनव्हॉईस मूल्य हे प्रत्यक्षातील भारतीय रुपयात (आयएनआर) असावे. (ह्यात, संदर्भ कालावधीमध्ये प्रमुख देश/प्रादेशिक गटाबाबत विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांना केलेले बिलिंगही समाविष्ट असावे.)
(14) एखाद्या कंपनीची दोन किंवा तीन एकके भारतामध्ये असून एक एकक भारताबाहेर - समजा युके मध्ये असल्यास त्यांनी ह्या आयटीईएस र्सव्हेमध्ये वेगवेगळ्याने भाग घ्यावा काय?
उत्तर :- भारतामधील सर्व एकके एकत्रित करुन त्या कंपनीने केवळ एकच फॉर्म सादर करावा. तथापि, परदेशातील एखाद्या व इतर सर्व एककांवरील माहिती शेड्युलच्या विभाग ड मध्ये देण्यात यावी.
(15) कर्मचा-यांच्या संख्येबाबतची माहिती, संदर्भ वर्षाच्या मार्च अखेरीस असल्याप्रमाणेच दिली जावी काय?
उत्तर :- होय. कर्मचा-यांच्या संख्येबाबतची माहिती संदर्भ वर्षाच्या मार्च अखेरीस असल्यानुसारच दिली जावी.
(16) एखादी कंपनी, विदेशातील दुस-याच एका कंपनीसाठी उत्पाद विकसित करण्यास सेवा देऊ करत असल्यास, ही माहिती आयटीईएस र्सव्हेमध्ये आम्ही कुठे द्यावी?
उत्तर :- तुम्हाला ह्या सेवेची टक्केवारी, विभाग-अ च्या क्यु-3 (ड) मधील ‘ऑफशोअर प्रॉडक्ट डेवलपमेंट’ खाली आणि त्याबाबतची एकत्रित रक्कम, सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स साठीच्या क्यु-5 (अ - 4) खाली निर्देशित करावयाची आहे.
(17) विभाग ब च्या प्रश्न 7 (3) मध्ये, ‘भारतीय कंपनीने, विदेशात, कार्यालयीन खर्च इत्यादींवर (विदेशातील कर्मचा-यांना दिलेली रक्कम सोडून) खर्च केलेली एकूण रक्कम’ खाली कोणत्या प्रकारचे खर्च येऊ शकतात?
उत्तर :- वर्षभरात विदेशातील कार्यालय चालविण्यासाठी सर्व खर्च, जसे इंटरनेट प्रदान, स्टेशनरी इत्यादि कार्यालयीन खर्चात समाविष्ट आहेत. तथापि, ते कार्यालय, संदर्भ वर्षात (समजा 2020-21) भारताबाहेर स्थापन केलेले असल्यास ते देखील ह्या मुद्दयांमध्ये समाविष्ट केले जातील.
(18) विभाग ब च्या प्रश्न-7 (4) मधील ‘भारतीय कंपनीने, संदर्भ कालावधीच्या सुरुवातीस विदेशात ठेवलेली/धारण केलेली एकूण रक्कम’ मध्ये कोणती रक्कम विचारात घेतली जावी?
उत्तर :- संदर्भ कालावधीच्या सुरुवातीस विदेशात असलेली एकूण रक्कम म्हणजे, संदर्भ कालावधीच्या सुरुवातीस, म्हणजे, एप्रिल 2020 - मार्च 2021 (‘एप्रिल 1, 2020’ म्हणून संदर्भित) विदेशातून मिळवावयाची/येणे असलेली (केलेल्या निर्यातीसाठीची) आऊटस्टँडिंग रक्कम, अकाऊंट्स रिसीव्हेबल्स (निर्यातीसाठी) चा हा ओपनिंग बॅलन्स आहे.
(19) आयटीईएस र्सव्हे शेड्युलच्या विभाग ब च्या प्रश्न 7 (5) मध्ये विचारात घ्यावयाची रक्कम कोणती?
उत्तर :- ‘परदेशात धारण केलेली/ठेवलेली रक्कम’ म्हणजे, आयातदारांकडून कंपनीला अजून न मिळालेली रक्कम. म्हणजेच, कंपनीने केलेल्या निर्यातीसाठीची अद्याप प्रदान न केलेली रक्कम. प्रश्न 7 (5) हा/म्हणजे, विदेशात ठेवलेल्या रकमेतील बदल आहे आणि तो बदल/फरक म्हणजे, बंद शिल्लक वजा खुलती शिल्लक एवढा आहे - म्हणजेच एप्रिल 2020 मधील खुलती शिल्लक वजा मार्च 2021 मधील बंद शिल्लक.
(20) इनव्हॉईस मूल्यामध्ये, ग्राहकाला बिलिंग केलेल्या सर्व रकमा समाविष्ट असतात. परंतु, सर्वच इनव्हॉईस बिले संदर्भ कालावधीत मिळत नाहीत. म्हणजे, एप्रिल 2020 ते मार्च 2021 ह्या कालावधीदरम्यान मिळालेली प्रत्यक्ष (वसुल झालेली) रक्कम आहे काय?
उत्तर :- होय. ही रक्कम म्हणजे, विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांना केलेल्या बिलिंगसह, संदर्भ कालावधीत प्रत्यक्ष मिळालेली (वसुल झालेली) रक्कम आहे.
(21) आम्ही विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांना सेवा देत आहोत. परंतु अशा दुय्यम संस्था मात्र भारताला कोणतीही सेवा पुरवित नाहीत. आयटीईएस र्सव्हे शेड्युलमध्ये आम्ही हे कोठे रिपोर्ट करावे?
उत्तर :- तुमच्या कंपनीला/कंपनीची एक सहाय्यक कंपनी असल्याने, विदेशातील सहाय्यक कंपन्यांशी संबंधित असलेला फॉर्मचा विभाग ड भरावा. वर्षभरात तुमच्या कंपनीच्या सहाय्यक कंपनीने काँप्युटर सॉफ्टवेअर व आयटीईएस ची कोणतीही विक्री केली नसल्यास ती रक्कम 0 (शून्य) असेल.
(22) विभाग अ च्या प्रश्न-3 मधील ‘कृपया तपशील द्यावा’ मध्ये काय निर्देशित करावे?
उत्तर :- सर्व चार प्रमुख कार्यकृतींच्या इतर वर्गाखाली तुम्ही टक्केवारी निर्देशित केली असलेल्या व्यवसाय कार्यकृतींची यादी द्यावी. यादी दिलेल्या इतर व्यवसाय कार्यकृतींची टक्केवारी ‘कृपया तपशील द्यावा’ मध्ये देण्याची गरज नाही.
(23) आयटीईएस र्सव्हे शेड्युलच्या अखेरीस असलेले घोषणापत्र भरणे आवश्यक आहे काय?
उत्तर :- होय. जेथे हा फॉर्म भरण्यास प्राधिकृत असलेली व्यक्ती दिलेल्या माहितीची जबाबदारी घेते व सीआयएन नंबर सह ची माहिती बिनचुक असल्याचे घोषित करते तेथे हे अपरिहार्य/सक्तीचे आहे. आयटीईएस र्सव्हे शेड्युलच्या विभाग अ ते ड मध्ये भरलेल्या तपशीलासाठीची ती अंतिम तपासणी आहे.
(24) आयटीईएस फॉर्म सादर केल्यावर आम्हाला त्याची पोच कशी दिली जाईल?
शेवटची प्रक्रिया केली जात असतानाच, सादरर्कत्या संस्थेला, सादर केलेल्या आयटीईएस माहितीची प्रणाली-निर्मित पोचपावती मिळते. ह्याबाबत कोणतीही वेगळी मेल पाठविली जाणार नाही.
(25) घातक असलेल्या व घातक नसलेल्या चुकांची त्यांच्या वर्णनासहित यादी द्या.
उत्तर :- कृपया खाली दिलेल्या एरर कोड्स असलेल्या (घातक चूक, घातक नसलेली चूक) कोष्टकाचा संदर्भ त्यांच्या वर्णनांसह घ्यावा. तुम्हाला प्रक्रियाकृत डेटाची, घातक एरर कोड्ससह पोचपावती मिळाली असेल तर, खाली दिलेल्या फेटल एटर संदेश/वर्णनाचे अनुसरण करावे आणि तुमचा डेटा सुधारित करुन, surveysoftex@rbi.org.in वर पुनश्च सादर करावा. तुम्हाला प्रक्रियाकृत डेटाची नॉन-फेटल एरर कोडसह (घातक नसलेल्या चुकीचा संकेत) पोचपावती मिळाली असेल तर त्या चुकांवर स्पष्टीकरण/समर्थन देऊन itesquery@rbi.org.in वर पाठवा.
अनु क्र |
सुधारित-फेटाळणी निकष |
सुधारित एरर मेसेज/वर्णन |
एरर कोड |
फेटल एरर |
1 |
सर्वेक्षणाचे वर्ष दिले गेले नसल्यास |
वर्ष मोकळे/न भरलेले (ब्लँक) ठेवता येत नाही. कृपया संदर्भ वर्ष विहित करुन अहवाल भरा. |
ITES_F_001 |
2 |
1) सर्वेक्षणाचे वर्ष बरोबर/अचूक नसल्यास |
सर्वेक्षणाचे वर्ष हे, प्रणाली मधील अगदी अलिकडे बंद/समाप्त सर्वेक्षण वर्षानंतरचे वर्ष असले पाहिजे. कृपया योग्य/अचूक सर्वेक्षण वर्ष विहित करा. |
ITES_F_001 |
|
2) सर्वेक्षणाचे वर्ष पुढील/भविष्यातील असल्यास |
कृपया योग्य सर्वेक्षण वर्ष विहित करा. कृपया < चालु सर्वेक्षणाचे वर्ष > ह्या र्सव्हे वर्षासाठी फॉर्म भरा. |
ITES_F_001 |
|
3) सर्वेक्षण बंद केले असल्यास. |
______साठीचे आयटीईएस सर्वेक्षण समाप्त/बंद झाले आहे. |
ITES_F_001 |
3 |
पॅन क्रमांक दिला नसल्यास |
पॅन क्रमांक देण्यात आलेला नाही. कृपया तुमच्या कंपनीचा पॅन क्रमांक विहित करा/भरा. |
ITES_F_002 |
4 |
पॅन क्रमांक पॅन क्रमांक |
पॅन क्रमांक अवैध आहे. कृपया तुमच्या कंपनीचा 10 आकडी अल्फा-न्युमरिक पॅन क्रमांक द्या. |
ITES_F_002 |
5 |
सीआयएन क्रमांक दिला गेला नसल्यास |
सीआयएन क्रमांक दिलेला नाही. कृपया कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने दिलेला तुमच्या कंपनीचा 21 आकडी अल्फा-न्युमरिक सीआयएन क्रमांक द्या. |
ITES_F_003 |
6 |
सीआयएन क्रमांक वैध नसल्यास |
सीआयएन क्रमांक अवैध आहे. कृपया तुमच्या कंपनीचा 21 अंकी अल्फा-न्युमरिक सीआयएन क्रमांक द्या. |
ITES_F_003 |
7 |
विभाग-अ मधील बाब क्रमांक 3 मधील व्यवसाय कार्यकृती दिली नसल्यास (ब्लँक) किंवा अपूर्ण असल्यास आणि 3-ई - व्यवसाय कार्यकृतींच्या टक्केवारी शेअरची बेरीज 100 होत नसल्यास कॉलम 3 मधील मजकूर - वर्ष मोकळे/न भरलेले (ब्लँक) ठेवता येत नाही. कृपया संदर्भ वर्ष विहित करुन अहवाल भरा. |
व्यवसाय कार्यकृतींची एकूण बेरीज 100 असली पाहिजे. कृपया विभाग अ च्या बाब क्र. 3 मध्ये दिलेल्या प्रत्येक व्यवसाय कार्यकृतीची योग्य/अचूक शेअर टक्केवारी द्या. |
ITES_F_005 |
8 |
विभाग – ब मध्ये, बाब क्र. 5(अ) एकुण निर्यात इनव्हॉईस मूल्य हे शून्य आहे किंवा ‘0” |
कृपया बाब क्र. 5(अ) मध्ये, तुमच्या कंपनीच्या व्यवसाय कार्यकृतींचे निर्यात इनव्हॉईस मूल्य द्या. आणि संदर्भ कालावधीमध्ये कोणतीही निर्यात झाली नसल्यास, कृपया 2 (ब) मध्ये निर्देशित केलेले ‘निल स्टेटमेंट’ निवडा. |
ITES_F_006 |
नॉन-फेटल एरर |
1 |
कॉलम 2 मध्ये विभाग अ, बाब 3 अ मध्ये दिलेल्या आयटी सेवांच्या शेअरची टक्केवारी आणि विभाग ब, बाब 5(अ)(1) मधील आयटी सेवा निर्यात इनव्हॉईस रक्कम/एकूण निर्यात मधून काढण्यात आलेली शेअर टक्केवारी ह्यात 1 टक्क्यापेक्षा अधिक फरक असल्यास |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग अ, बाब 3 अ मध्ये दिलेल्या व्यवसाय कार्यकृतीच्या शेअरची टक्केवारी, विभाग ब, बाब 5 (अ) (1) मध्ये दिलेल्या संगत/संबंधित निर्यात इनव्हॉईस मूल्याशी जुळत आहे. |
ITES_NF_001 |
2 |
विभाग अ, बाब 3 ब मध्ये दिलेल्या आयटीईएस/बीपीओ च्या शेअरची टक्केवारी आणि विभाग ब, बाब 5(अ)(2) मधील आयटीईएस/बीपीओ सेवा निर्यात इनव्हॉईस रक्कम/एकूण निर्यात मधून काढण्यात आलेली शेअर टक्केवारी ह्यात एक टक्क्यापेक्षा अधिक फरक असल्यास. |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग अ, बाब 3 अ मध्ये दिलेल्या व्यवसाय कार्यकृतीच्या शेअरची टक्केवारी, विभाग ब, बाब 5 (अ)(2) मध्ये दिलेल्या संगत/संबंधित निर्यात इनव्हॉईसशी जुळत आहे. |
ITES_NF_002 |
3 |
विभाग अ, बाब 3 क मध्ये दिलेल्या इंजिनियरिंग सेवांच्या शेअरची टक्केवारी, आणि विभाग ब, बाब 5(अ)(3) मधील इंजिनियरिंग सेवा निर्यात इनव्हॉईस रक्कम/एकूण निर्यात मधून काढण्यात आलेली शेअर टक्केवारी ह्यात एक टक्क्यापेक्षा अधिक फरक असल्यास. |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग अ, बाब 3 क मध्ये दिलेल्या, व्यवसाय कार्यकृती इंजिनियरिंग सेवांच्या शेअरची टक्केवारी, विभाग ब, बाब 5 (अ)(3) मध्ये दिलेल्या संबंधित निर्यात इनव्हॉईस मूल्याशी जुळत आहे. |
ITES_NF_003 |
4 |
विभाग अ, बाब 3 ड मध्ये दिलेल्या सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स निर्यातीच्या शेअरची टक्केवारी आणि विभाग ब, बाब 5(अ)(4) मधील, सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स निर्यात इनव्हॉईस रक्कम/एकूण निर्यात मधून काढण्यात आलेली शेअर टक्केवारी ह्यात एक टक्क्यापेक्षा अधिक फरक असल्यास. |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग अ, बाब ड मध्ये दिलेल्या, सॉफ्टवेअर प्रॉडक्ट निर्यातीच्या व्यवसाय कार्यकृतीची शेअर टक्केवारी, विभाग ब, बाब 5(अ)(4) मध्ये दिलेल्या संगत/संबंधित निर्यात इनव्हॉईस मूल्याशी जुळत आहे. |
ITES_NF_005 |
5 |
विभाग ब, बाब 5(अ) मधील विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांना बिलिंग केलेली एकूण निर्यात रक्कम रिकामी (ब्लँक) असल्यास. |
कृपया विभाग ब, बाब 5(अ) मध्ये, विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांना, एकूण निर्यातीच्या केलेल्या बिलिंगची रक्कम द्यावी. |
ITES_NF_006 |
6 |
विभाग ब च्या बाब 5(ब) मधील एकूण निर्याती - आयएनआरमध्ये रिपोर्ट केलेल्या प्रमुख मुद्रा आणि विभाग ब, बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्याती ह्यात 5 टक्क्यांपेक्षा अधिक फरक असल्यास. |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग ब, बाब 5 (ब) मध्ये आयएनआर मध्ये रिपोर्ट केलेल्या प्रमुख मुद्रा - एकूण निर्याती, विभाग ब च्या बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्यातींशी जुळत आहेत. |
ITES_NF_010 |
7 |
विभाग ब च्या बाब 5 (क) मध्ये दिलेल्या एकूण निर्याती - सेवांचे प्रकार आणि विभाग ब, बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्याती ह्यात 5 टक्क्यांपेक्षा अधिक फरक असल्यास. |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग ब च्या बाब 5 (क) मध्ये रिपोर्ट केलेल्या एकूण निर्याती सेवांचे प्रकार, विभाग ब च्या बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्यातींशी जुळत आहेत. |
ITES_NF_011 |
8 |
विभाग ब च्या बाब 5 (3) मध्ये रिपोर्ट केलेल्या एकूण निर्याती - प्रमुख क्षेत्रे आणि विभाग ब च्या बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्याती ह्यामध्ये 5 टक्क्यांपेक्षा अधिक फरक असल्यास. |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग ब च्या बाब 5 (ड) मध्ये रिपोर्ट केलेल्या एकूण निर्याती - प्रमुख क्षेत्रे, विभाग ब च्या बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्यातींशी जुळत आहेत. |
ITES_NF_012 |
9 |
विभाग ब, बाब 6 मध्ये दिलेल्या एकूण निर्याती - पुरवठ्याची रीत आणि विभाग ब च्या बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्याती ह्यात 5 टक्क्यांपेक्षा अधिक फरक असल्यास |
कृपया खात्री करुन घ्यावी की, विभाग ब च्या बाब 6 मध्ये रिपोर्ट केलेल्या एकूण निर्याती - पुरवठ्याची रीत, विभाग ब च्या बाब 5 (अ) मध्ये दिलेल्या एकूण निर्यातींशी जुळत आहेत. |
ITES_NF_013 |
10 |
विभाग क (1) च्या बाब क्र. 7 मधील म्हणजे सेल एबी 83 मधील निर्यात उत्पन्न - प्राप्ती, खर्च व विदेशात ठेवलेले ह्यावरील माहिती रिकामी (ब्लँक) किंवा शून्य असल्यास. |
कृपया विभाग क च्या बाब क्र. 7 मध्ये, निर्यातीचे उत्पन्न - प्राप्ती, खर्च व विदेशात ठेवलेले ह्यावरील संपूर्ण माहितीचा तपशील द्यावा. |
ITES_NF_007 |
11 |
विभाग क, बाब क्र. 8 मधील, सेल 014 - कर्मचा-यांची संख्या शून्य किंवा रिकामी (ब्लँक) असल्यास. |
विभाग क च्या बाब क्र. 8 मध्ये, कृपया कर्मचा-यांची संख्या वरील संपूर्ण तपशील द्यावा. |
ITES_NF_008 |
12 |
विभाग ड, बाब क्र. 9 (अ) मधील, विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांची एकूण संख्येवरील माहिती रिकामी (ब्लँक) असल्यास. |
कृपया विभाग ड च्या बाब क्र. 9 मध्ये, विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांची संख्यावरील संपूर्ण तपशील द्यावा. |
ITES_NF_014 |
13 |
9 (ब) मधील नॉन-झीरो रोजची संख्या, विभाग ड च्या बाब क्र. 9 (अ) मध्ये दिलेल्या, विदेशातील दुय्यम/सहाय्यक संस्थांची संख्याबरोबर/समान असावी. |
कृपया, विभाग (ड) च्या बाब 9 (अ) मध्ये दिलेली दुय्यम संस्थांची संख्या, 9 (ब) मध्ये दिलेल्या दुय्यम संस्थांची संख्याशी जुळत आहे काय ह्याची तपासणी करा |
ITES_NF_009 |
14 |
संस्थेचे स्वरुप (फॉर्म) नक्त किंवा ब्लँक म्हणून सिलेक्ट केल्यास. |
विभाग अ च्या बाब अ मध्ये कृपया संस्थेचे स्वरुप द्या. |
ITES_NF_015 |
|