Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 02/01/2020
एटीएम/व्हाईट लेबल एटीएम

(जानेवारी 01, 2020 रोजी अद्यावत केलेले)

(1) ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) म्हणजे काय ?

उत्तर : एटीएम हे एक संगणीकृत यंत्र असून, ते बँकांच्या ग्राहकांना, बँक शाखेला भेट न देताही, रोख रक्कम काढण्यासाठी व वित्तीय तसेच अ-वित्तीय व्यवहार करण्यासाठी त्यांच्या खात्यात प्रवेश/व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देते.

(2) व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्युएलए) म्हणजे काय ?

उत्तर : स्वतः एक बँक नसलेल्या संस्थांनी स्थापन केलेल्या, त्यांच्या मालकीच्या व चालविल्या जाणा-या एटीएम्सना डब्ल्युएलए म्हणतात. व बँक नसलेल्या एटीएम ऑपरेटर्सना, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रदान व समायोजन अधिनियम 2007 खाली प्राधिकृत केलेले असते. प्राधिकृत डब्ल्युएलए ऑपरेटर्सची यादी आरबीआयच्या वेबसाईटवरील https://www.rbi.org.in/Scripts/PublicationsView.aspx?id=12043 लिंकवर उपलब्ध आहे.

(3) बँकेचे एटीएम व डब्ल्युएलए ह्यामध्ये मिळणा-या सुविधांमध्ये एक ग्राहक म्हणून काही फरक आहे काय ?

उत्तर : एखाद्या ग्राहकासाठी, डब्ल्युएलए चा वापर करणे, इतर कोणत्याही बँकेच्या (कार्ड देणारी बँक सोडून) एटीएमचा वापर करण्यासारखेच आहे.

(4) बँक नसलेल्या संस्थांना डब्ल्युएलए स्थापन करण्याची परवानगी देण्यामागील तत्वमीमांसा काय आहे ?

उत्तर : बँक नसलेल्या संस्थांना व्हाईट लेबल एटीएम स्थापन करण्यामागील तत्वमीमांसा म्हणजे, विशेषतः ग्रामीण क्षेत्रांमध्ये वाढीव/बाधित ग्राहक सेवा देण्यासाठी एटीएम्सची भौगोलिक व्याप्ती वाढविणे.

(5) एटीएम्स/डब्ल्युएलएमध्ये कोणकोणत्या सेवा/सुविधा उपलब्ध असतात ?

उत्तर : रोख रक्कम देण्याव्यतिरिक्त एटीएम्स/डब्ल्युएलए अनेक इतर सेवा/सुविधा देऊ शकतात. त्यापैकी काही सेवा म्हणजे -

  • खातेविषयक माहिती

  • रोख रक्कम जमा करणे

  • नियमित बिलांचे प्रदान

  • मोबाईल्ससाठी रि-लोड व्हाउचर्सची खरेदी (ह्यासाठी डब्ल्युएलएला परवानगी नाही).

  • लघु/छोटे विवरणपत्र निर्माण करणे.

  • पीआयएनमधील बदल

  • चेकबुकसाठी विनंती करणे.

(6) एटीएम/डब्ल्युएलए मध्ये कोणत्या प्रकारची कार्डे वापरता येतात ?

उत्तर :- एखाद्या एटीएम/डब्ल्युएलए मध्ये व्यवहार करण्यासाठी ग्राहकाजवळ एक वैध कार्ड व व्यक्तिगत ओळख क्रमांक (पिन) असणे आवश्यक आहे. आरबीआयने कार्डलेस (विना कार्ड) निकासींनाही एटीएममध्ये परवानगी दिली आहे.

(7) एटीएम/डब्ल्युएलए मध्ये व्यवहार करण्यासाठीच्या पूर्व-आवश्यकता कोणत्या ?

उत्तर : एखाद्या एटीएम/डब्ल्युएलए मध्ये व्यवहार करण्यासाठी ग्राहकाजवळ वैध कार्ड व वैय्यक्तिक ओळख क्रमांक (पीआयएन) असणे आवश्यक आहे.

(8) व्यक्तिगत ओळख क्रमांक (पीआयएन) म्हणजे काय ?

उत्तर : पीआयएन हा एक संख्यात्मक पासवर्ड असून, कार्ड देतेवेळी, बँकांकडून तो ग्राहकाला वेगळ्याने पाठविला/दिला जातो. बहुतेक बँका, कार्डाचा प्रथम वापर करतानाच तो बदलण्यास ग्राहकांना सांगतात. ग्राहकांनी त्यांचा पीआयएन, बँक अधिका-यांसह इतर कोणालाही सांगु नये. ग्राहकांनी त्यांचा पीआयएन नियमित कालावधीने बदलावा.

(9) भारतामधील बँकेनी दिलेली कार्डे, देशातील कोणत्याही एटीएम/डब्ल्युएलए मध्ये वापरता येऊ शकतात काय ?

उत्तर : होय. भारतामधील बँकांनी दिलेली कार्डे देशातील कोणत्याही एटीएम/डब्ल्युएलए मध्ये वापरता येतात.

(10) ऑन-अस व ऑफ-अस व्यवहार म्हणजे काय ?

उत्तर : कार्ड देणा-या बँकेच्या एटीएममध्ये केलेल्या व्यवहाराला ऑन-अस व्यवहार म्हणतात. कार्ड देणा-या बँकेऐवजी निराळ्या/दुस-या बँकेच्या एटीएममध्ये मध्ये केलेल्या व्यवहाराला ऑफ-अस व्यवहार म्हणतात. उदा. - अ ह्या बँकेने दिलेले कार्ड, अ बँकेच्याच एटीएममध्ये वापरले गेल्यास तो ऑन-अस व्यवहार होतो; अ बँकेने दिलेल्या कार्डाचा वापर एखाद्या डब्ल्युएलएमध्ये किंवा ब ह्या बँकेच्या एटीएममध्ये केल्यास तो ऑफ-अस व्यवहार होतो.

(11) एटीएममध्ये निःशुल्क व्यवहार करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे काय ?

उत्तर : होय, बँकांनी त्यांच्या बचत खातेधारकांना एटीएममध्ये खाली दिल्यानुसार किमान संख्येचे निःशुल्क व्यवहार देऊ केलेच पाहिजेत :

  • कोणत्याही ठिकाणी असलेल्या बँकेच्या स्वतःच्या एटीएममधील व्यवहार (ऑन-अस व्यवहार): एटीएमचे ठिकाण कोठेही असले तरी बँकांनी त्यांच्या बचत खातेदारांना एका महिन्यात किमान पाच निःशुल्क व्यवहार देऊ केले पाहिजेत. रोख रक्कम निकासी नसलेले कितीही व्यवहार निःशुल्क दिले जातील.

  • महानगरामधील ठिकाणी अन्य बँकेच्या एटीएममधील व्यवहार (ऑफ-अस व्यवहार): सहा महानगरांमधील ठिकाणी, म्हणजे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरु व हैद्राबाद येथील एटीएम्ससाठी, बँकांनी त्यांच्या बचत खातेदारांना दरमहा किमान तीन निःशुल्क व्यवहार (वित्तीय व अवित्तीय) दिलेच पाहिजेत.

  • महानगर नसलेल्या ठिकाणी इतर बँकांच्या एटीएममधील व्यवहार (ऑफ-अस व्यवहार): वरील सहा महानगरी ठिकाणांव्यतिरिक्त, इतर कोणत्याही ठिकाणी, बँकांनी त्यांच्या बचत खातेदारांना, इतर बँकांच्या एटीएममध्ये दरमहा किमान पाच निःशुल्क व्यवहार (वित्तीय व अवित्तीय) दिलेच पाहिजेत.

(12) एटीएममध्ये केलेल्या निःशुल्क व्यवहारांची संख्या बँका वाढवू शकतात काय ?

उत्तर : एटीएममधील किमान निःशुल्क व्यवहारांची संख्या आरबीआयने अपरिहार्य केली आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना अधिक निःशुल्क व्यवहार देऊ शकतात.

(13) वरील निःशुल्क व्यवहार बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यालाही (बीएसबीडीए) लागु आहे काय ?

उत्तर : बीएसबीडीए मधील निकासींची संख्या, अशा खात्यांशी संलग्न अटींनुसार असल्याने, हे बीएसबीडीएला लागु होत नाही.

(14) ज्यांना निःशुल्क व्यवहारांखाली मोजता येत नाही असे काही प्रकारचे व्यवहार आहेत काय ?

उत्तर :- निःशुल्क व्यवहारांच्या संख्येत, इतर बँकांच्या एटीएममधील वित्तीय व बिगर-वित्तीय व्यवहार समाविष्ट आहेत. तथापि, स्वतःच्या बँकेच्याच एटीएमवरील, रोख रक्कम निकासी नसलेले व्यवहार (जसे, शिल्लक रकमेची चौकशी, चेक बुक विनंती, कर प्रदान, निधी हस्तांतरण इत्यादि) हे निःशुल्क एटीएम व्यवहार संख्येचा भाग असत नाहीत. त्याचप्रमाणे, हार्डवेअर, सॉफ्ट वेअर, दळणवळण समस्या, एटीएममध्ये चलनी नोटा उपलब्ध नसणे आणि बँक/सेवादाता ह्यांचीच थेट/संपूर्ण जबाबदारी असलेल्या इतर बाबी, अवैध पिन/वैध करणे इत्यादी तांत्रिक कारणांमुळे अयशस्वी झालेले व्यवहार, त्या ग्राहकासाठी वैध एटीएम व्यवहार म्हणून मोजण्यात/समजण्यात येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही आकार लावले जाणार नाहीत.

(15) एखाद्या एटीएमचे ठिकाण महानगरी आहे की गैर महानगरी हे कसे समजावे ?

उत्तर : निःशुल्क व्यवहारांच्या संख्येची उपलब्धता समजण्याबाबत ग्राहकाला त्या एटीएमचा दर्जा समजण्यास मदत होण्यासाठी, एटीएम स्थापन करणा-या बँकांना सांगण्यात आले आहे की त्यांनी सुयोग्य साधनांनी (स्टीकर/पोस्टर इत्यादि), प्रत्येक एटीएमच्या ठिकाणी, ते एटीएम, ‘महानगरी’ ठिकाणी आहे की ‘गैर महानगरी’ ठिकाणी आहे हे स्पष्टपणे निर्देशित करावे.

(16) एटीएममधील व्यवहारांसाठी ग्राहकांना आकार लावला जातो काय ?

उत्तर : होय. अपरिहार्य केलेल्या निःशुल्क व्यवहारांच्या संख्येपेक्षा (वरील प्रश्न 11 च्या उत्तरात निर्देशित केलेल्या) जास्त व्यवहारांसाठी ग्राहकांना आकार लावला जाऊ शकतो. तथापि, सध्या हे आकार, त्याच्या/तिच्या बँकेकडून, प्रति व्यवहार कमाल रु.20/- पेक्षा अधिक असू शकत नाहीत.

(17) एटीएममध्ये क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी व विदेशातील एटीएममधून निकासी करण्यासाठी आरबीआयने कोणते आकार विहित केले आहेत ?

उत्तर : पुढील प्रकारच्या रोकड निकासीसाठीचे सेवा आकार बँकांनी स्वतःच ठरवावयाचे आहेत.

(अ) क्रेडिट कार्डांचा वापर करुन केलेली रोकड-निकासी

(ब) विदेशात असलेल्या एटीएममधून रोकड-निकासी.

(18) ग्राहकाचा एटीएम व्यवहार अयशस्वी होऊन त्याच्या/तिच्या खात्यात डेबिट झाल्यास त्याने/तिने काय करावे ?

उत्तर :- अशा बाबतीत बँकांनी स्वतःच तो व्यवहार उलट करणे अपेक्षित असले तरीही, कार्ड देणा-या बँकेकडे किंवा एटीएमच्या मालक बँकेकडे लवकरात लवकर तक्रार दाखल करणे ही नेहमीच एक चांगली रीत आहे.

(19) तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहकाला संपर्क क्रमांक कोठून मिळतील ?

उत्तर : बँकांनी त्यांच्या एटीएमच्या ठिकाणी, संबंधित अधिका-यांचे संपर्क क्रमांक/टोल फ्री क्रमांक/हेल्प डेस्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

(20) वरील प्रश्न क्र. 18 मध्ये निर्देशित केल्यानुसार अयशस्वी झालेल्या व्यवहारासाठी, ग्राहकाच्या खात्यात ती रक्कम पुनः जमा करण्यासाठी, कार्ड देणा-या बँकांसाठी काही कालमर्यादा आहे काय ?

उत्तर :- एखादा एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास, तो अयशस्वी झाल्याच्या तारखेपासून 5 कॅलेंडर दिवसांच्या आत, ग्राहकाच्या खात्यात ती रक्कम पुनः जमा करणे बँकांसाठी अपरिहार्य करण्यात आले आहे.

(21) एखादा व्यवहार अयशस्वी झाल्यानंतरच्या विलंबासाठी भरपाई मिळविण्यास ग्राहक पात्र आहेत काय ?

उत्तर :- होय. अयशस्वी झालेल्या एटीएम व्यवहाराच्या तारखेपासून 5 कॅलेंडर दिवसांनंतर ग्राहकाची रक्कम त्याच्या खात्यात पुनः क्रेडिट करण्याबाबतच्या प्रत्येक दिवसासाठी रु.100/- प्रति दिवस अशी भरपाई, कार्ड देणा-या बँकेने देणे आवश्यक आहे. ग्राहकाने ह्याबाबत कोणताही दावा केला नसला तरीही ही भरपाई ग्राहकाच्या खात्यात जमा करावयाची आहे.

(22) बँकेने रक्कम उलट करणे व भरपाई देणे न केल्यास ग्राहकाने कोणती कारवाई करावी ?

उत्तर :- ग्राहक, त्याच्या/तिच्या बँकेत जाऊन ही बाब उपस्थित करु शकतो. बँकेकडून उत्तर मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत किंवा बँकेकडून 30 दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास ग्राहक बँकिंग लोकपालाकडे जाऊ शकतो. बँकिंग लोकपालाच्या कार्यालयाचा तपशील https://rbi.org.in/Scripts/AboutUsDisplay.aspx?pg=BankingOmbudsmen.htm ह्या लिंकवर दिला आहे. किंवा https://cms.rbi.org.in/cms/IndexPage.aspx?aspxerrorpath=/cms/cms/indexpage.aspx येथे ऑनलाईन तक्रार करावी.

(23) एटीएम कार्डाची वैधता संपल्यास किंवा संबंधित खाते बंद केले गेल्यास काय करावे ?

उत्तर : कार्डाची वैधता संपल्यावर किंवा संबंधित खाते बंद केले असल्यास, ते कार्ड फेकून देण्यापूर्वी त्याच्या मॅग्नेटिक स्ट्रिप/चिपमध्ये कापून त्याचे चार तुकडे करावेत.

(24) ग्राहकाने त्याचे/तिचे एटीएम/डब्ल्युएलए व्यवहार कशाप्रकारे सुरक्षित ठेवावेत ?

उत्तर : ग्राहकांनी त्यांचे एटीएम/डब्ल्युएलएमधील व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील अवश्य करा व करु नका सूचना पाळाव्यात.

  • ग्राहकांनी त्यांचे एटीएम/डब्ल्युएलए व्यवहार संपूर्ण खाजगीत/एकटे असताना करावेत.

  • एटीएम/डब्ल्युएलएच्या किऑस्कमध्ये एकावेळी केवळ एकच कार्ड धारकाने प्रवेश करावा.

  • कार्ड धारकाने त्याचे/तिचे कार्ड अन्य कोणालाही देऊ नये.

  • कार्ड धारकाने त्या कार्डावर पीआयएन लिहू नये.

  • कार्ड धारकाने तो पीआयएन अन्य कोणाही बरोबर शेअर करु नये.

  • एटीएममध्ये एंटर करतेवेळी कार्डधारकाने तो पीआयएन अन्य कुणाच्या दृष्टीस पडू देऊ नये.

  • सहजपणे अंदाज करता येईल असा पीआयएन ग्राहकाने कधीही वापरु नये.

  • कार्ड धारकाने त्याचे कार्ड एटीएम/डब्ल्युएलएमध्ये कधीही कार्ड विसरुन/ठेवून जाऊ नये.

  • एटीएम/डब्ल्युएलएमध्ये केलेल्या व्यवहारांसाठीचे अॅलर्ट मिळण्यासाठी कार्ड धारकाने त्याचा/तिचा मोबाईल क्रमांक कार्ड देणा-या बँकेकडे पंजीकृत करावा. खात्यामध्ये अनधिकृत कार्ड-व्यवहार दिसून आल्यास त्याबाबत कार्ड देणा-या बँकेला ताबडतोब कळवावे.

  • कार्ड धारकाने जागृत/सावध राहून, एटीएम/डब्ल्युएलएला काही अतिरिक्त साधने जोडली आहेत काय ह्याची तपासणी करावी. अशा प्रकारचे साधन/साधने ग्राहकाचा डेटा लबाडीने मिळविण्यासाठी जोडलेली असू शकतात. तसे आढळल्यास, सुरक्षा रक्षक/बँक/डब्ल्युएलए संस्थेला ताबडतोब कळवावे.

  • एटीएम/डब्ल्युएलएच्या सभोवती काही संशयास्पद हालचाली आहेत काय ह्यावरही कार्ड धारकाने नजर ठेवावी. त्याला/तिला बोलण्यात गुंतविण्याचा किंवा मदत करण्याचा/एटीएम ऑपरेट करण्यास मदत करण्याचा प्रयत्न करणारांपासून त्याने/तिने सावध रहावे.

  • कार्ड धारकांनी लक्षात ठेवावे की, बँकेचे अधिकारी तुमच्या कार्डाचा तपशील किंवा पीआयएन फोन/ईमेल वर कधीही मागणार नाहीत. त्यामुळे, त्याच्या/तिच्या बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगणा-या अशा कोणत्याही संदेशाला त्याने/तिने प्रतिसाद देऊ नये.

(25) कार्ड हरविल्यास/चोरीस गेल्यास काय करावे ?

उत्तर : असे गहाळ होणे/चोरी नजरेस आल्यावर ग्राहकाने ताबडतोब कार्ड देणा-या बँकेशी संपर्क साधून ते कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करावी.

(26) मॅग्नेटिक स्ट्राईप कार्डे व ईएमव्ही चिप अँड पीआयएन कार्डे म्हणजे काय ?

उत्तर : मॅग्नेटिक स्ट्राईप कार्डे, त्या कार्डाला असलेल्या मॅग्नेटिक स्ट्राईपवरील कार्ड डेटा साठवून ठेवतात, तर ईएमव्ही चिप अँड पीआयएन कार्डामधील डेटा चिपमध्ये साठविलेला असतो.

(27) मॅग्नेटिक स्ट्राईप कार्डे किंवा ईएमव्ही चिप अँड पिन कार्डे देण्याबाबत बँकेसाठी कोणते मँडेट आहे ?

उत्तर : विद्यमान सर्व मॅग्नेटिक स्ट्राईप कार्डांचे ईएमव्ही अँड पिन कार्डांमध्ये रुपांतरण, डिसेंबर 31, 2018 पूर्वी करण्यासाठी बँकांना सांगण्यात आले आहे. एखाद्या कार्ड धारकाच्या मॅग्नेटिक स्ट्राईप कार्डाच्या बदली त्याला/तिला ईएमव्ही अँड पिन कार्ड दिले गेले नसल्यास, त्याने/तिने ताबडतोब त्याच्या/तिच्या बँक शाखेत बदली कार्ड मिळविण्यासाठी जावे.

हे एफएक्यु भारतीय रिझर्व्ह बँकेने केवळ माहितीसाठी व सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी दिले आहेत. ह्यावर आधारित केलेल्या कृती आणि/किंवा घेतलेले निर्णय ह्यासाठी ही बँक जबाबदार असणार नाही. कोणत्याही प्रकारची काही स्पष्टीकरणे किंवा अर्थांतरणांसाठी, ह्या बँकेने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेतले जाते.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä