2005 पूर्वी जारी केलेल्या बॅंक नोटा परत घेतल्या जाणार – रिझर्व्ह बॅंकेचे स्पष्टीकरण
22 जानेवारी 2014 रोजी या विषयावरिल जारी केलेले प्रेस रिलीज आणि त्या अनुषंगाने केल्या जाणा-या चौकशीला उत्तर म्हणून भारतीय रिझर्व्ह बॅंक (भारिबॅं) याद्वारे स्पष्ट करीत आहे की, 2005 पूर्वी छापलेल्या नोटा बाजारातून काढून घेण्यामागची कारण मिमांसा अशी आहे की या नोटांमध्ये 2005 नंतर छापलेल्या नोटांपेक्षा कमी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. जुन्या सिरीजच्या नोटा चलनातून काढून घेणे ही प्रमाण आंतरराष्ट्रीय प्रथा आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंक नेहमीच्या कामाचा भाग म्हणून अशा बॅंक नोटा बॅंकाद्वारे बाजारातून काढून घेत असते. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या दृष्टीने 2005 पूर्वी छापलेल्या व अजून चलनात असलेल्या बॅंक नोटा जनतेवर खूप मोठा प्रभाव टाकेल इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीत. तथापि, भारतीय रिझर्व्ह बॅंक जनतेला सूचित करीत आहे की, त्यांनी त्यांच्या सोयीच्या बॅंक शाखांमध्ये नोटा बदलण्यास सुरुवात करावी. शिवाय, 1 जुलै 2014 नंतरही जनता त्यांचे ज्या बॅंकेत खाते आहे अशा बॅंक शाखांमध्ये जुन्या सिरीजच्या कितीही नोटा बदलू शकते.
भारतीय रिझर्व्ह बॅंक पुढे असेही आश्वासन देत आहे की, बॅंक जुन्या सिरीजच्या नोटा काढून घेण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवील व आढावा घेत राहील म्हणजे जनतेची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही. असे असले तरी भारतीय रिझर्व्ह बॅंक पुनरुच्चार करीत आहे की 2005 पूर्वी छापलेल्या नोटा कायदेशीर चलन म्हणून चालू राहतील.
(अल्पना किलावाला)
प्रधान मुख्य महाप्रबंधक
प्रेस रिलीज: 2013-2014/1491 |