Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (121.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/08/2014
जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी, आरबीआयने अलिकडेच दिलेले सुलभीकृत केवायसी उपाय

26 ऑगस्ट 2014

जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी,
आरबीआयने अलिकडेच दिलेले सुलभीकृत केवायसी उपाय

भारतीय रिझर्व बँकेने, बँक खाती उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या “तुमचा ग्राहक जाणा”(केवायसी) नॉर्म्सशी संबंधीत काही सर्वसामान्य प्रश्न असलेली एक सूचना/टिप्पणी, एक पोस्टरएक पुस्तिका ह्यासह आज प्रसृत केली आहे. ह्याचा उद्देश म्हणजे, सामान्य माणसाला सध्याच्या काळात बँक खाते उघडल्यास मदत होण्यासाठी, रिझर्व बँकेने केलेल्या सुलभीकृत उपायांची जाणीव जनतेला करुन देणे हा आहे.

सुलभीकरणांसाठी केलेले उपाय

(1) ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा ह्यासाठी केवळ एकच दस्त

ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा ह्यासाठी आता दोन वेगवेगळे दस्त देण्याची आता आवश्यकता नाही. बँक खाते उघडण्यासाठी सादर केलेल्या अधिकृतरीत्या वैध अशा दस्तामध्ये त्या व्यक्तीची ओळख व पत्ता दोन्हीही दिलेले असल्यास, अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा देण्याची आवश्यकता नाही.

केवायसीसाठी अधिकृत रितीने वैध असलेली कागदपत्रे (ओव्हीडी) म्हणजे, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, मतदार आयडी कार्ड, पॅन कार्ड, युआयडीएआयने दिलेले आधार पत्र आणि राज्य सरकारच्या अधिका-याने सही केलेले, एनआरईजीएने दिलेले जॉब कार्ड.

ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी, ई-केवायसी प्रक्रियेद्वारे, युआयडीएआय कडून मिळालेले व नाव, पत्ता, वय, लिंग इत्यादी व फोटोग्राफ असलेले दस्तही “अधिकृतरीत्या वैध दस्त” म्हणून समजले जाईल.

(2) विद्यमान पत्त्यासाठी, पत्त्यासाठीचा वेगळा पुरावा देण्याची आवश्यकता नाही

स्थलांतर करणारे कामगार, स्थलांतरित कर्मचारी इत्यादींना, बँक खाते उघडण्यासाठी, विद्यमान पत्त्याचा पुरावा देण्यात नेहमीच अडचणी येत असल्याने, असे ग्राहक, बँक खाते उघडताना किंवा ते नियतकालिक अद्यावत करताना, केवळ एकच पत्त्याचा (विद्यमान किंवा कायम) पुरावा सादर करु शकतात. ग्राहकाने सादर केलेल्या पत्त्याच्या पुराव्यामधील पत्त्यापेक्षा, त्याचा विद्यमान पत्ता निराळा असल्यास, त्याने/तिने, त्याच्या/तिच्या विद्यमान पत्त्याबाबत दिलेले घोषणापत्रही पुरेसे आहे.

(3) त्याच बँकेच्या एका शाखेमधून दुस-या शाखेमध्ये खात्याचे हस्तांतरण करण्यासाठी वेगळ्याने केवायसी कागदपत्र आवश्यक नाहीत

बँकेच्या एका शाखेने एकदा केवायसी केल्यावर त्याच बँकेच्या इतर कोणत्याही शाखेमध्ये खाते हस्तांतरित करण्यासाठी ते वैध असेल. कोणत्याही निर्बंधाशिवाय आणि संपर्कासाठीच्या पत्त्यासाठी त्याने/तिने दिलेल्या घोषणापत्राच्या आधारावर, एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे हस्तांतरण करण्याची परवानगी ग्राहकाला आहे.

(4) छोटी खाती

“अधिकृतरीत्या वैध कागदपत्रांपैकी” कोणतेही दस्त नसलेल्या व्यक्ती, बँकेमध्ये “छोटी खाती” उघडू शकतात. असे “छोटे खाते”, स्वत:च सत्यांकन केलेले छायाचित्र सादर करुन व बँकेच्या अधिका-याच्या उपस्थितीत (त्याची/तिची) सही करुन किंवा अंगठ्याची निशाणी उमटवून उघडले जाऊ शकते. तथापि अशा खात्यांबाबत, एकूण कर्जांच्या बाबतीत (एका वर्षात रु. एक लाखांपेक्षा अधिक नाही) व निकासींच्या बाबतीत (एका महिन्यात रु. दहा हजारांपेक्षा अधिक नाही) आणि खात्यातील शिल्लकेबाबत (कोणत्याही वेळी रु. पन्नास हजारांपेक्षा अधिक नाही) मर्यादा घातल्या आहेत. अशी छोटी खाती सर्वसाधारणतः बारा महिन्यांसाठीच वैध असतील. त्यानंतर मात्र, असे छोटे खाते उघडल्यानंतर बारा महिन्यांच्या आत, त्या खातेदाराने, अधिकृत रीत्या वैध कागदपत्रांसाठी त्याने/तिने अर्ज केला असल्याचे दस्त उपलब्ध करुन दिल्यास, अशी खाती आणखी बारा महिन्यांसाठी चालु राहतील.

(5) कमी जोखमीच्या ग्राहकांसाठी अधिकृत रीत्या वैध कागदपत्रांबाबत (ओव्हीडी) शिथिलीकरण

वर दिलेली “अधिकृत रीत्या वैध कागदपत्रे” एखाद्या व्यक्तीकडे नसतील आणि बँकांद्वारे ती व्यक्ती “कमी जोखीम” असलेली म्हणून वर्गीकृत केली गेल्यास, तो/ती पुढील पैकी कोणतेही एक दस्त सादर करुन खाते उघडू शकते.

(अ) केंद्रीय/राज्य सरकारचे विभाग/खाती, वैधानिक/विनियामक प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अनुसूचित वाणिज्य बँका, व सार्वजनिक वित्तीय संस्था ह्यांनी, अर्जदाराच्या फोटोसह दिलेले ओळखपत्र. 

(ब) त्या व्यक्तीचा साक्षांकन केलेल्या फोटोसह राजपत्रित अधिका-याने दिलेले पत्र. 

(6) केवायसीचे नियतकालिक अद्यावत करणे

विद्यमान असलेल्या, कमी/मध्यम व उच्च जोखमीच्या ग्राहकांसाठीच्या केवायसीचे नियतकालिक अद्यावतीकरणाचा कालावधी 5/2 वर्षांपासून अनुक्रमे 10/8/2 वर्षे असा वाढविण्यात आला आहे.

(7) अन्य शिथिलीकरणे

(1) स्वयं सेवा गटाचे बचत खाते उघडताना, त्या स्वयं सेवा गटाच्या (एसएचजी) सर्व सभासदांच्या केवायसीची पडताळणी करण्याची आवश्यकता नाही, तर त्या एसएचजीच्या केवळ पदाधिका-यांच्या केवायसीची पडताळणी केली तरी पुरे. त्या एसएचजीच्या कर्ज जोडणीच्या वेळीही वेगळ्याने केवायसी पडताळणी करण्याची आवश्यकता नाही.

(2) विदेशातील विद्यार्थ्यांना, त्यांचा स्थानिक पत्ता देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

(3) कमी जोखमीचा म्हणून वर्गीकृत केला गेलेला ग्राहक ख-या कारणांमुळे केवायसीचे कागदपत्र सादर करण्यास असमर्थ झाल्यास, तो/ती, खाते उघडण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत बँकेकडे ते कागदपत्र सादर करु शकते.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2014-2015/410

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä