Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (72.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/11/2014
रद्द केलेल्या एनबीएफसी पंजीकरण प्रमाणपत्राच्या गैरवापराबाबत आरबीआयचा इशारा

24 नोव्हेंबर 2014

रद्द केलेल्या एनबीएफसी पंजीकरण प्रमाणपत्राच्या गैरवापराबाबत आरबीआयचा इशारा

भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, रिझर्व बँकेने रद्द केलेले पंजीकरण प्रमाणपत्र बनावट/नक्कल करुन, कंपन्या, भागीदारी कंपन्या, व्यक्ती इत्यादींसह काही संस्था/लबाड लोक, आरबीआयकडे पंजीकृत झालेल्या अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) म्हणून खोटेपणाने वावरत आहेत. असे समजते की, अशा संस्था/लबाड लोक, गरजवंत लोकांना आकर्षक व्याजदरावर कर्जे देण्याची आश्वासने देऊन, त्या कर्जांचे/अग्रिम राशींचे प्रक्रिया आकार म्हणून जनतेकडून पैसे गोळा करतात आणि ते पैसे मिळाल्यावर गायब होतात.

अशा फसवाफसवीच्या कार्यकृती/ऑफर्स कायद्याने दंडनीय आहेत. जनतेला सांगण्यात येत आहे की त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि अशा खोट्या कार्यकृती/ऑफर्सना बळी पडू नये आणि अशा कार्यकृती त्यांच्या नजरेस आल्यास स्थानिक पोलिसांना त्याबाबत कळवावे.

व्यवहाराची सत्यता, वित्तीय संस्था म्हणून कार्य करण्यास, सुयोग्य विनियमन प्राधिकरणाने दिलेल्या पंजीकरण प्रमाणपत्राची सत्यता व अधिकारपत्रे ह्यांची पडताळणी केल्याशिवाय, कोणत्याही व्यक्तीला/संस्थांना पैसे किंवा वित्तीय आश्वासन देऊ नका.

जाणून घ्या ! सुरक्षित रहा !

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्रांसाठी निवेदन 2014-2015/1054

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä