Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (102.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/04/2015
आरबीआयचा 80 वा वाढदिवस साजरा : भारताचे दारिद्र्य दूर करण्यासाठी बँकिंग समाजाला उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांद्वारे कळकळीची विनंती

एप्रिल 3, 2015

आरबीआयचा 80 वा वाढदिवस साजरा : भारताचे दारिद्र्य दूर करण्यासाठी बँकिंग समाजाला उद्दिष्टे
निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांद्वारे कळकळीची विनंती

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी भारतीय रिझर्व बँकेला कळकळीची विनंती केली की, तिने, गरीब लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी, पुढील 20 वर्षात वित्तीय समावेशन करण्यासाठी ठोस उद्दिष्टे ठेवण्यास वित्तीय संस्थांना प्रोत्साहन देण्यात पुढाकार घ्यावा. मी येथे, निर्धन, कोणतीही सवलत नसलेल्या, सीमान्त, जमातींचा एक प्रतिनिधी म्हणून येथे आलो आहे. मी त्यांच्यापैकीच एक आहे. मी त्यांच्या वतीने विनंती करत आहे आणि तुम्ही मला निराश करणार नाही असा मला विश्वास वाटतो. भारतीय रिझर्व बँकेचा 80 व्या वर्धापन दिन संपन्न करण्यासाठी आयोजित केलेल्या वित्तीय समावेशन परिषदेत पंतप्रधान असे म्हणाले. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस, मुंबई येथे एप्रिल 2, 2015 रोजी ही परिषद भरली होती.

रिझर्व बँकेच्या 80 व्या वर्धापन दिनी, प्रधान मंत्र्यांनी, रिझर्व बँक, तिचे कर्मचारी आणि ह्या संस्थेच्या विकासासाठी योगदान देणा-या इतर सर्वांची स्तुती केली. ते स्वतः आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांच्या दरम्यान दर दोन महिन्यांनी होत असलेल्या चर्चेचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, त्यामधील सैाजन्य हे, सरकार व रिझर्व बँक ह्यादरम्यान, विचारांचे साधर्मच दर्शविते. रिझर्व बँकेच्या भूमिकेबाबत मी समाधानी आहे.

अर्थमंत्री श्री. अरुण जेटली, महाराष्ट्राचे माननीय गव्हर्नर श्री. सी. विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित असलेल्या इतर सन्माननीय व्यक्ती म्हणजे रिझर्व बँकेचे भूतपूर्व गव्हर्नर्स, डेप्युटी गव्हर्नर्स, आणि वरिष्ठ अधिकारी, वित्तीय नियंत्रणाचे प्रमुख अधिकारी, वित्तीय बँकांचे वित्तीय समावेशन व तंत्रज्ञान विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी/व्यवस्थापकीय संचालक/प्रभारी महाव्यवस्थापक, प्रादेशिक ग्रामीण बँकांचे अध्यक्ष, मायक्रो वित्त संस्था, व्यापार पत्रकार, प्रशिक्षण संस्था ह्यांचे प्रतिनिधी.

एफ एम म्हणतात की पुढील आव्हान म्हणजे गरीबांना इतर लाभ देणे हे आहे.

सुरुवातीला श्री. अरुण जेटली, भारताचे माननीय अर्थ मंत्री ह्यांनी रिझर्व बँक, वाणिज्य बँका व त्यांचे कर्मचारी ह्यांचे, प्रधान मंत्र्यांच्या जनधन योजनेच्या यशासाठी अभिनंदन केले, आणि ते म्हणाले की, पुढील आव्हान, ही खाती कार्यान्वित करणे व समावेशक वाढ सत्यात उतरविण्यासाठी वित्तीय समावेशन यशस्वी करणे हे असेल. रिझर्व बँकेच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित स्तुती करताना वित्त मंत्री म्हणाले की, सरकार व रिझर्व बँक ह्या दरम्यानचा संवाद हा नेहमीच विधायक असतो.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, गरीब व छोट्या लोकांना पर्याय व संधी देऊ करुन सशक्त करा.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात पुढील कार्यांचे स्मरण करुन दिले आणि म्हणाले की, येत्या वर्षामध्ये, मालकी नसलेले, संस्थात्मक नसलेले व तंत्रज्ञान आधारित स्तरावरील एक स्पर्धात्मक कार्य क्षेत्र निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. सर्व लोकांना वित्तीय सेवा देण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा असल्याने, माहिती मिळविणे व तिचे विश्लेषण करणे, व व्यवहारांचा खर्च कमी करणे ह्यासाठी बँका नवनवीन रीती वापरत असल्याने क्षणार्धात (टच अँड गो) प्रदान करणारे तंत्रज्ञानच वापरले जाईल. रिझर्व बँकेने तिचे सायबर-सुपरविजन व सायबर सुरक्षा सशक्त/बळकट केली असल्याने रिझर्व बँकेची अत्याधुनिक प्रदान प्रणाली ही तंत्रज्ञान आधारितच असेल. त्यानंतर ते म्हणले की, बँका किंवा संस्थांमध्ये अनेकदा असलेल्या जोखमी समावून घेण्यासाठी केंद्रीय बँक अधिक सखोल बाजारपेठ विकसित करण्यावर भर देईल.

गव्हर्नरांनी सावधानतेचा इशारा दिला की, पायाभूत सोयींना पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय बलामुळे वित्तीय स्थिरतेला धक्का लागू नये, कारण, ती राष्ट्रीय सुरक्षतेसाठीची गुरु किल्लीच आहे. त्यांनी असेही सुचविले की, ह्याही पुढे जाऊन, भारताच्या पायाभूत सोयींच्या गरजांसाठीच्या कर्जांची रक्कम कमी असावी (रिझर्व बँकेने ही प्रणाली डिलिव्हरेज केली आहे). ह्यासाठी, जोखीम भांडवलासाठी रिझर्व बँकेने नवीन स्त्रोत निर्माण करणे आवश्यक आहे.

“प्रत्येक घराजवळ व प्रत्येक छोट्या उद्योगाजवळ वित्तीय सेवा उपलब्ध करुन देणे, हेच ह्या देशाचे सर्वात मोठे वित्तीय आव्हान असू शकते. बँकांच्या शाखेत प्रवेश करण्यापासून गरीब लोक अजूनही खूप दूर आहेत किंवा तेवढे सुखी नाहीत” असे सांगून ते पुढे म्हणाले “पंतप्रधान जनधन योजना आणि मुद्रा बँक, ह्यासारखे पुढाकार, नवनवीन तंत्रज्ञाने, नवीन संस्था, आणि लाभांचे थेट हस्तांतरण ह्यासारख्या नव्या प्रक्रिया ह्यामधून आपला देश गरीब व छोट्या लोकांना, पर्याय व संधी देऊन अधिक बळकट करील असा मला विश्वास वाटतो. आणि त्याच वेळी, ग्राहकाला सुरक्षा व उपभोक्ता शिक्षण दिले जाईल ह्याची खात्री रिझर्व बँकेला करुन द्यावी लागेल”

भाषण संपवताना ते म्हणाले की, सशक्त अशा राष्ट्रीय संस्था तयार करणे खूप कठीण आहे. ह्यासाठी विद्यमान असलेल्या संस्थांचे बाहेरुन संवर्धन केले पाहिजे व आतून त्यांना पुनर्जीवन दिले पाहिजे कारण अशा मूल्यवान संस्था फार कमी आहेत.

पंच मंडळाची चर्चा

माननीय अशा महत्वाच्या व्यक्तींच्या भाषणानंतर, वित्तीय समावेशनासंबंधीच्या प्रश्नांवर चार पॅनल (पंचसभा) चर्चा करण्यात आली. (1) वित्तीय समावेशन - सर्व प्रयत्न फलदायी होवोत. (2) वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता व ग्राहक संरक्षण ह्यांच्या दरम्यानचे दुवे/जोडणी. (3) वित्तीय समावेशनासाठी बिझिनेस केस तयार करणे. बीसी मॉडेल हाच पुढील मार्ग आहे काय?; आणि (4) वाणिज्य बँकिंग, वित्तीय संस्था, केंद्र सरकार, अबँकीय वित्तीय कंपन्या, स्वयंसेवा गट, पत्रकारिता ह्यामधील तज्ञ आणि रिझर्व बँकेच्या संचालक मंडळातील सभासद ह्यांनी ह्या पॅनल चर्चासत्रात भाग घेतला होता. प्रत्येक चर्चेवर, एका डेप्युटी गव्हर्नरचा अंकुश होता.

रिझर्व बँकेच्या संक्षिप्त इतिहासाचे वितरण

“भारतीय रिझर्व बँक, 1935-1981 चा संक्षिप्त इतिहास” चे वितरणही माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रसंगी केले. रिझर्व बँकेच्या अंतर्गत कागदपत्रांबाबत हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. रिझर्व बँकेची 1935 मध्ये स्थापना झाल्यापासून ते 1981 पर्यंतच्या, तिच्या संस्थात्मक इतिहासाच्या प्रथम तीन ग्रंथांमधील सुमारे 3000 पृष्ठांचे संक्षिप्त स्वरुप असलेला, “दि कन्साईज हिस्टरी ऑफ रिझर्व बँक ऑफ इंडिया” हा ग्रंथ म्हणजे, सर्वसामान्य जनतेत तिच्याबाबत असलेले गूढ वलय दूर करण्याचा असा केंद्रीय बँकेने केलेला आणखी एक प्रयत्न आहे.

आरबीआय पर्यावरण-स्नेही कृती

“ग्रो ट्रीज” नावाच्या एका बिनसरकारी संस्थेमार्फत देशाच्या निरनिराळ्या भागात 200 झाडे लावण्याचा उपक्रम, रिझर्व बँकेने, एक पर्यावरण-स्नेही कृती म्हणून हाती घेतला आहे. प्रधान मंत्र्यांचे स्वागत करतेवेळी, पुष्पगुच्छ देण्याऐवजी, ह्याबाबतचे प्रमाणपत्रच त्यांना देण्यात आले.

त्यानंतर, चेन्नईच्या सरकारी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फाडलेल्या/चिंध्या केलेल्या नोटांमधून तयार केलेली ”दांडी मार्च” ही कलाकृती, व्यासपीठावरील प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीला एक आठवण म्हणून देण्यात आली.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्रासाठी निवेदन : 2014-2015/2083

संबंधित दुवे

भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन यांचे सुरूवातीचे भाषण

पंतप्रधान यांचे भाषण

पंतप्रधान यांचे भाषणाचा संपूर्ण हिंदी मजकूर

आरबीआय च्या 80 व्या वर्धापन दिना च्या उद्घाटन समारंभाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä