जून 25, 2015
रु.100 च्या बँक नोटा आता नंबर पॅनलमध्ये वाढत जाणा-या आकारातील अंकयुक्त असणार
रिझर्व बँकेने आता, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु.100 च्या नोटा, अंकाच्या नवीन नमुन्यात प्रसृत केल्या आहेत. ह्या बँक नोटांच्या दोन्हीही नंबर पॅनल्समधील अंक डावीकडून उजवीकडे वाढत्या आकारात असतील; तर पहिली तीन अक्षर-अंक चिन्हे (प्रिफिक्स) एकसमान आकारात असतील (चित्र पहा).
नवीन अंकांचा नमुना
वाढत्या आकारात अंक छापले जाणे हे एक सहज दिसणारे लक्षण असल्याने जनतेला आता ख-या व खोट्या नोटा सहजतेने ओळखता येतील. खोट्या नोटा तयार करणे कठीण करण्यासाठी व ख-या नोटा ओळखणे जनतेसाठी सुलभ करण्यासाठी, रिझर्व बँक, भारत सरकारशी चर्चा करुन, सुरक्षा लक्षणात सुधारणा करत आहे.
क्रमांक देण्याची नवीन योजना सोडल्यास, वाढत्या आकाराचे अंक असलेल्या ह्या बँक नोटांचे डिझाईन, इतर सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील सध्याच्या रु.100 च्या नोटांप्रमाणेच आहे. ह्या नोटावरही ₹ हे चिन्ह दर्शनी व पाठीमागच्या बाजूवर असेल. तसेच दोन्हीही नंबरिंग पॅनल्समध्ये “R” हे इनसेट अक्षर असेल आणि ह्या नोटांच्या पाठीमागच्या बाजूवर, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी. राजन ह्यांची सही व छपाईचे वर्ष ‘2015’ छापलेले असेल.
मागील काळात रिझर्व बँकेने वितरित केलेल्या रु.100 च्या बँक नोटा एक वैध चलन असणे सुरुच राहील.
अनुक्रमांक देण्याचा हा नवीन साचा, इतर सर्व मूल्यांच्या बँक नोटांवरही टप्प्याटप्प्याने वापरला जाईल.
अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2014-2015/2750 |