Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (81.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 25/06/2015
2005 पूर्वीच्या मालिकेच्या नोटा काढून घेण्याची तारीख आरबीआय वाढवणार

जून 25, 2015

2005 पूर्वीच्या मालिकेच्या नोटा काढून घेण्याची तारीख आरबीआय वाढवणार

2005 पूर्वीच्या बँक नोटा बदलून देण्याची तारीख आरबीआयद्वारे आता डिसेंबर 31, 2015 पर्यंत वाढविण्यात आली आहे. डिसेंबर 2014 मध्ये तिने, नोटा बदलण्याची अंतिम तारीख जून 30, 2015 अशी ठरविली होती.

ह्या नोटा चलनामधून काढून घेण्यासाठी जनतेचे सहकार्य मिळावे ह्यासाठी, रिझर्व बँकेने विनंती केली होती की, जनतेने जुन्या डिझाईनच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा कराव्यात किंवा त्यांच्या सोयीच्या बँक शाखेतून बदलून घ्याव्यात. रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले आहे की, ह्या नोटा बदलताना त्यांची संपूर्ण किंमत मिळेल. अशा सर्व नोटा वैध चलन म्हणूनच समजण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ह्या कारवाईचे स्पष्टीकरण देताना, रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले आहे की, महात्मा गांधी मालिकेतील बँक नोटा एका दशकापासून चलनात/व्यवहारात आहेत. ह्यापैकी बहुतांश नोटा बँक शाखांद्वारे काढून घेण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे उर्वरित जुन्या डिझाईनच्या नोटा व्यवहारांमधून काढून घेण्याचे ठरविण्यात आले आहे. एकाच वेळी, विविध मालिकांच्या नोटा व्यवहारात न ठेवणे ही एक प्रमाणित आंतरराष्ट्रीय रीत आहे, असे रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले.

जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास/अडचणी येऊ नयेत ह्यासाठी, रिझर्व बँक ह्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणे व आढावा घेणे सुरुच ठेवील.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्रासाठी निवेदन : 2014-2015/2751

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä