ऑगस्ट 24, 2015
भोपाळ येथील कृष्णा मर्कंटाईल सहकारी बँक लि. वर आरबीआयद्वारे
सांपत्तिक दंडाची अंमलबजावणी
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी बँकांना लागु असलेल्या, कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 (1)(ब) च्या तरतुदींखाली मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, कृष्णा मर्कंटाईल सहकारी बँक लि., भोपाळ वर, रिझर्व बँकेने दिलेल्या, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लाँडरिंग नॉर्म्सच्या निदेशांचे/मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे उल्लंघन केल्याबद्दल, रु.5.0 लाख (रुपये पाच लाख) सांपत्तिक दंड लावला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने संदर्भित बँकेवर एक कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बाबींचा विचार केल्यानंतर, रिझर्व बँक, ह्या निष्कर्षावर आली की, उल्लंघन निश्चितपणे झाले असून, सांपत्तिक दंड लावणे आवश्यक आहे.
संगीता दास
संचालक
वृत्तपत्रासाठी निवेदन : 2015 - 16/476 |