ऑगस्ट 21, 2015
पुणे येथील रुपी सहकारी बँक लि. ला आरबीआयने दिलेल्या निदेशांचा विस्तार
भारतीय रिझर्व बँकेने (निदेश क्र. डीसीबीआर सीओ एआयडी/ डी -10/12.22.218/ 2015-16 ऑगस्ट 20, 2015 अन्वये) रुपी सहकारी बँक, पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांचा सहा महिन्यांसाठी (ऑगस्ट 22, 2015 ते फेब्रुवारी 21, 2016) विस्तार केला आहे. तथापि, पुनरावलोकनाची अट लागु आहे. हे निदेश सुरुवातीला फेब्रुवारी 22, 2013 ते ऑगस्ट 21, 2013 पर्यंत लागु होते आणि ते तीन वेळा प्रत्येकी सहा महिन्यांसाठी आणि दोन वेळा प्रत्येकी तीन महिन्यांसाठी विस्तारित करण्यात आले होते. शेवटचा विस्तार काल, तीन महिन्यांचा (मे 21, 2015 ते ऑगस्ट 21, 2015) होता.
बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित, त्याच अधिनियमाच्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली रिझर्व बँकेला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन ह्या निदेशांची अंमलबजावणी करण्यात आली. हित संबंधित जनतेने पाहण्यासाठी ह्या निदेशाची एक प्रत वरील बँकेमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.
रिझर्व बँकेने दिलेले हे निदेश म्हणजे, वरील बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे असे समजले जाऊ नये. त्या बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत, ती बँक, निर्बंधांसह बँक व्यवहार करणे सुरुच ठेवील. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार करु शकेल.
संगीता दास
संचालक
वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015 -2016/467 |