ऑगस्ट 21, 2015
अंक फलकांमध्ये (न्युमरल पॅनल्स) वाढत्या आकाराचे अंक असलेल्या
व ‘L’ ह्या इनसेट अक्षरासह रुपयाचे चिन्ह रु. असलेल्या रु.1000 च्या बँक नोटांचे प्रसारण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका 2005 मधील, दर्शनी भागावरील तसेच मागील भागावरील दोन्हीही नंबरिंग पॅनल मध्ये ‘L’ ह्या अक्षरासह रु. हे चिन्ह असलेल्या, व भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी. राजन ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागील भागावर ‘2015’ हे छपाईचे वर्ष असलेल्या, रु. 1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे.
ह्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, आधी दिल्या गेलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मध्ये प्रसृत केलेल्या रु.1000 च्या बँक नोटांप्रमाणेच असेल, मात्र, दोन्हीही नंबरिंग पॅनल्समधील पहिली तीन अल्फा न्युमरिक चिन्हे (प्रिफिक्स) एकसमान आकारात असतील, तर त्या पॅनल्समधील अंकांचा आकार डावीकडून उजवीकडे वाढता असेल.
नंबरिंग पॅनल्समध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या रु.100 व रु.500 च्या बँक नोटा ह्या आधीच प्रसारित करण्यात आल्या आहेत.
ह्या बँकेने मागील काळात प्रसृत केलेल्या रु.1000 च्या बँक नोटा, वैध चलन असणे सुरुच राहील.
संगीता दास
संचालक
वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015 - 16/466 |