ऑगस्ट 13, 2015
बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली निदेश - शताब्दी महिला सहकारी बँक लि. ठाणे, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र
निदेश क्र.युबीडी सीओ बीएसडी-आयडी-5/12.22.504/2014-15 दि. ऑगस्ट 14, 2014 अन्वये, शताद्वी महिला सहकारी बँक लि., ठाणे, ह्यांना, 20 ऑगस्ट 2014 रोजी कामकाज बंद झाल्यापासून, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. निदेश क्र. डीसीबीआर सीओ बीएसडी-आयडी- 31/12.22.504/2014-15 दि. फेब्रुवारी 4, 2015 अन्वये, ह्या निदेशाची वैधता, फेब्रुवारी 19, 2015 रोजी कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, फेब्रुवारी 04, 2015 च्या निदेशाच्या वाचनासह, दि. ऑगस्ट 14, 2014 च्या निदेशाचा कार्यकाल, म्हणजे, ऑगस्ट 18, 2015 च्या कामकाज समाप्ती पासून ते नोव्हेंबर 07, 2015 पर्यंत, आमचे सुधारित निदेश डीसीबीआर सीओ एआयडी क्र./डी 04/12.22.504/2015-16 जुलै 21, 2015 अन्वये आणखी तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. ह्यात पुनरावलोकनाची अट लागु आहे. इतर अटी व शर्ती बदललेल्या नाहीत. वरील बदल/सुधारणा अधिसूचित करणा-या जुलै 21, 2015 च्या निदेशाची प्रत, त्या बँकेमध्ये जनतेने पाहण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने केलेला बदल हा, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याबाबत, रिझर्व बँकेचे समाधान झाले असल्याचे चिन्ह समजले जाऊ नये. अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/394 |