Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (81.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/09/2015
आरबीआयकडून, दि वैश सहकारी वाणिज्य बँक लि., नवी दिल्ली ह्यांना निदेश/सूचना देण्यात आल्या.

सप्टेंबर 9, 2015

आरबीआयकडून, दि वैश सहकारी वाणिज्य बँक लि., नवी दिल्ली ह्यांना निदेश/सूचना देण्यात आल्या.

दि वैश सहकारी वाणिज्य बँक लि., नवी दिल्ली ह्यांना, जनतेच्या हिताचा विचार करुन काही/विशिष्ट निदेश देणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे.  त्यानुसार बँकिंग रेग्युलेशन अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, बँकिंग रेग्युलेशन अधिनियम,  1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निदेश देत आहे की, सप्टेंबर 8, 2015 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून दि वैश सहकारी वाणिज्य बँक लि., रिझर्व बँकेकडून त्याबाबत लेखी मंजुरी प्राप्त केल्याशिवाय, पुढील कार्यकृती करणार नाही - कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देणे किंवा त्यांचे नूतनीकरण करणे; कोणतीही गुंतवणुक करणे, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह, कोणतेही दायित्व/जबाबदारी अंगावर घेणे; किंवा असे दायित्व/जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किंवा अन्यथा ही, कोणत्याही रकमेचे वाटप करणे किंवा त्यासाठी परवानगी देणे; किंवा खाली दिलेल्या रीती व तिच्या व्याप्ती व्यतिरिक्त, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था करुन, तिच्या मालमत्तेची किंवा अॅसेट्सची विक्री,  हस्तांतरण किंवा अन्य प्रकारे हातावेगळी करणे.

(1) प्रत्येक बचत खाते किंवा चालु खाते किंवा कोणत्याही नावाने असलेले ठेवी खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधील, रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) एवढी रक्कम त्या खातेदाराला काढण्यास परवानगी दिली जावी मात्र - अशा ठेवीदाराचे कोणत्याही प्रकारे बँकेशी दायित्व असल्यास, (म्हणजे कर्जदार म्हणून किंवा हमीदार म्हणून) ती रक्कम आधी संबंधित कर्ज खात्यात तडजोडित केली जावी.

(2) विद्यमान मुदत ठेवींचे, त्या परिपक्व झाल्यावर, त्याच नावाने व त्याच क्षमतेत नूतनीकरण.

(3) वरील निदेशात परवानगीप्राप्त असलेला खर्च.

भारतीय रिझर्व बँकेने खास लेखी मंजुरी दिल्याशिवाय, ती बँक, अन्य कोणतीही जबाबदारी/दायित्व घेणार नाही किंवा संपविणार नाही.

हितसंबंधित असलेल्या जनतेच्या वाचनासाठी सविस्तर निदेश बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहेत.  परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.  आरबीआयने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, बँकेचा बँक व्यवहार परवाना रद्द करण्यात आला आहे असे समजले जाऊ नये.  बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक, निर्बंधांसह बँकिंग व्यवहार करणे सुरु ठेवू शकते.  ह्या सूचना पुढील सूचना दिल्या जाईपर्यंत जारी असतील

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्रासाठी निवेदन : 2015-2016/626

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä