Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (81.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/09/2015
भारतीय रिझर्व बँकेकडून, नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि. नाशिक ह्यांना निदेश/सूचना देण्यात आल्या.

सप्टेंबर 9, 2015

भारतीय रिझर्व बँकेकडून,
नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि. नाशिक ह्यांना निदेश/सूचना देण्यात आल्या.

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, बँकिंग रेग्युलेशन अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या, कलम 35 अ च्या पोट-कलम (1) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि. नाशिक ह्यांना काही निदेश/सूचना दिल्या असून, त्यानुसार, सप्टेंबर 9, 2015 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून, ही भारतीय रिझर्व बँकेकडून त्याबाबत लेखी मंजुरी प्राप्त केल्याशिवाय पुढील कार्यकृती करणार नाही - कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देणे किंवा त्यांचे नूतनीकरण करणे, कोणतीही गुंतवणुक करणे, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह कोणतेही दायित्व अंगावर घेणे, जबाबदारी किंवा दायित्व पूर्ण करण्यास किंवा अन्यथा, कोणत्याही रकमेचे वाटप करणे किंवा त्यासाठी परवानगी देणे किंवा कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था करुन, (आरबीआयच्या, 8 डिसेंबर 2015 मध्ये अधिसूचित केलेल्या सूचना वगळल्यास, ह्या अधिसूचनेची प्रत, हितसंबंधित असलेल्या जनतेच्या माहितीसाठी सदर बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित केली आहे) तिच्या कोणत्याही मालमत्तेची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य वासलात लावणे. विशेषतः, प्रत्येक बचत किंवा चालु खात्यात किंवा कोणत्याही अन्य नावाच्या ठेवी खात्यात असलेल्या एकूण शिल्लक रकमेमधून, रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) एवढी रक्कम, आरबीआयच्या वरील निदेशात दिलेल्या अटीनुसार, संबंधित ठेवीदाराला काढण्याची परवानगी आहे.

आरबीआयने वरील निदेश/सूचना दिल्या आहेत ह्याचा अर्थ, आरबीआयने ह्या बँकेचा बँक व्यवहार करण्याचा परवाना रद्द केला आहे असे समजले जाऊ नये. ह्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ही बँक, घातलेल्या निर्बंधांसह, बँकिंग व्यवहार करणे सुरुच ठेवील. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्रासाठी निवेदन : 2015-2016/629

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä