Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (79.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/09/2015
बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खालील निदेश - चौंडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर.

सप्टेंबर 3, 2015

बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खालील निदेश - चौंडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर.

निदेश क्र. युबीडी सीओ बीएस डी-आय/ डी -07/12.22.044/2014-15 दि. ऑगस्ट 28, 2014 अन्वये चौंडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना, ऑगस्ट 30, 2014 रोजीच्या कामकाज बंद होण्यापासून, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेश/सूचनांखाली ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी 05, 2015 रोजीच्या निदेशाच्या अन्वये, वरील निदेशाची वैधता, सहा महिन्यांसाठी (मार्च 01, 2015 ते ऑगस्ट 31, 2015) वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी अधिसूचित करण्यात येत आहे की, फेब्रुवारी 05, 2015 च्या निदेशासह वाचित, ऑगस्ट 28, 2014 च्या निदेशाचा कार्यकाल, आमचा सुधारित निदेश दि. जुलै 31, 2015 अन्वये, सप्टेंबर 1, 2015 पासून पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी तीन महिने वाढविण्यात आला आहे. वरील निदेशाच्या इतर अटी व शर्तीमध्ये बदल केलेला नाही. वरील बदल/सुधारणा केलेल्या जुलै 31, 2015 च्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी त्या बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने केलेली सुधारणा/बदल ह्याचा अर्थ, त्या बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे, असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
(सहाय्यक महाव्यवस्थापक)

वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/581.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä