ऑगस्ट 28, 2015
सप्टेंबर 1, 2015 पासून, दुस-या व चैाथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असेल - कामकाजाच्या शनिवारी, आरबीआय तिच्या आधारभूत सेवा बँकांना देणार.
सप्टेंबर 01, 2015 पासून सर्व अनुसूचित व अन-अनुसूचित बँकांना (सार्वजनिक, खाजगी, विदेशी, सहकारी, प्रादेशिक ग्रामीण, व स्थानिक प्रदेश बँका) सार्वजनिक सुट्टी असेल आणि दुसरा व चैाथा शनिवार सोडून इतर शनिवारी त्या पूर्णवेळ काम करतील (वृत्तपत्रांसाठीच्या निवेदनात ह्यांना कामकाजाचा शनिवार म्हटले आहे). ह्यानुसार, 1 सप्टेंबर 2015 पासून रिझर्व बँकेने कार्यकृतींमध्ये पुढील बदल घोषित केले आहेत.
(1) वित्तीय बाजार विभाग
(अ) व्यवहारांसाठी शनिवारी सध्या खुले असलेले वित्तीय बाजार विभाग कामकाजाच्या सर्व शनिवारी खुले राहतील. म्हणजे,
(1) सर्व वित्तीय बाजार विभाग (म्हणजे, कॉल/नोटिस/टर्म मनी, मार्केट रेपो आणि तारणयुक्त कर्ज घेणे व देणे दायित्व (सीबीएलओ) नेहमीच्या व्यवहाराच्या दिवशीप्रमाणेच कामकाजाच्या सर्व शनिवारी खुले राहतील, आणि
(2) फोरेक्स मार्केट व सरकारी सिक्युरिटीजचे मार्केट्स (सर्व ओटीसी डेरिवेटिव मार्केट्स सह) वर दिल्याप्रमाणे सर्व शनिवारी बंद राहतील.
(ब) रिझर्व बँक, कोणत्याही नित्यनियमित व्यवहारांच्या दिवसाप्रमाणेच, कामकाजाच्या सर्व शनिवारीही संध्याकाळी 7.00 व 7.30 च्या दरम्यान, फिक्स्ड रेट रिव्हर्स रेपो, तसेच मार्जिनल स्टँडिंग सुविधे (एमएसएफ) च्या विंडो ची कार्यवाही/कार्यान्वन करणे सुरुच ठेवील.
(क) कामकाजाच्या सर्व शनिवारी, रिझर्व बँक, सकाळी 9.30 ते 10.30 एक फिक्सड् रेट लिक्विडिटी अॅडजेस्टमेंट सुविधा (एलएएफ) रेपो विंडो कार्यान्वित करील. खरे पाहता, कामकाजाच्या शनिवारी असलेली एलएएफ रेपो विंडो ही, शुक्रवारच्या एलएएफ विंडोचाच विस्तार असेल. म्हणजेच, शुक्रवारी, बँका, तीन दिवसासाठी, विहित केलेल्या मर्यादेत कर्ज घेऊ शकतील, आणि वापरली न गेलेली शेष मर्यादा, कामकाजाच्या शनिवारी 2 दिवसांसाठी वापरु शकतील.
(2) प्रदान प्रणाली
(1) दुस-या व चैाथ्या शनिवारी, प्रदान प्रणाली कार्यरत नसतील, परंतु कामकाजाच्या शनिवारी त्या संपूर्ण दिवस कार्यान्वित असतील. प्रदान प्रणालीमध्ये विशेष करुन, रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस), नॅशलनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) देशातील निरनिराळ्या बँकांच्या समाशोधन गृहांद्वारे चालविल्या जाणारे चेक समाशोधन, (ग्रिड बेस्ड चेक ट्रंकेशन सिस्टिम (सीटीएस) सह आणि ईसीएस सुट (इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्व्हिस (ईसीएस), रिजनल इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्व्हिस (आरईसीएस) व नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्व्हिस (एनईसीएस) ह्यांचा समावेश असेल.
(2) मूल्य दिवस दुस-या किंवा चैाथ्या दिवशी येणा-या भविष्यातील मूल्य दिनांकित व्यवहारांवरील प्रक्रिया, आरटीजीएस व ईसीएस सुट मध्ये केली जाणार नाही.
(3) बँकिंग विभाग
रिझर्व बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांमधील बँकिंग विभाग, वित्तीय बाजार व प्रदान प्रणालींना पाठिंबा देण्यासाठी, कामकाजाच्या शनिवारी पूर्ण दिवस उघडे राहतील. सरकारी व्यवहार, कामकाजाच्या शनिवारी एजन्सी बँकांमध्ये केले जातील.
येथे स्मरण व्हावे की, भारत सरकारने, ऑगस्ट 20, 2015 रोजी एका अधिसूचनेद्वारे (भारताचे राजपत्र, असाधारण, भाग 2, कलम 3, पोट कलम (2) मध्ये प्रकाशित), पराक्रम्य संलेख अधिनियम, 1881 (1881 चा 26) च्या कलम 25 खाली, प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चैाथ्या शनिवारी बँकांसाठी सुटी जाहीर केली होती. त्यानुसार, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 (1934 चा 2) च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश असला किंवा नसला तरीही, 1 सप्टेंबर 2015 पासून, सर्व बँका, दुस-या व चैाथ्या शनिवारी सुट्टी ठेवतील. बँकेची वित्तीय बाजारांची व प्रदान व तडजोड प्रणालीची एक नियंत्रक म्हणून, रिझर्व बँकेने, तिच्या काही कार्यकारी क्षेत्रात सहाय्यक बदल केले आहेत.
वरील व्यवस्थेचे सहा महिन्यांनी पुनरावलोकन केले जाईल.
अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक वृत्तपत्रांसाठी निवेदन 2015-2016/528 |