‘खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र येथील दि जनता वाणिज्य सहकारी बँक लि.’ दिलेल्या सूचना रिझर्व बँकेद्वारे मागे/परत घेण्यात येत आहेत. |
ऑगस्ट 28, 2015
‘खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र येथील दि जनता वाणिज्य सहकारी बँक लि.’
दिलेल्या सूचना रिझर्व बँकेद्वारे मागे/परत घेण्यात येत आहेत.
भारतीय रिझर्व बँकेने, ‘दि जनता वाणिज्य सहकारी बँक लि. खामगाव (बुलढाणा), महाराष्ट्र’ ह्यांना सप्टेंबर 12, 2012 रोजी दिलेल्या सर्वसमावेशक सूचना, ऑगस्ट 26, 2015 रोजी कामकाज बंद झाल्यापासून मागे घेतल्या आहेत.
बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (2) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, रिझर्व बँकेने ह्या सूचना मागे घेतल्या आहेत. हितसंबंध असलेल्या जनतेच्या माहितीसाठी, ह्या आदेशाची एक प्रत बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. ह्यानंतरही ती बँक तिचे नित्य बँक व्यवहार करणे सुरुच ठेवील.
संगीता दास
संचालक
वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/534 |
|