सप्टेंबर 10, 2015
श्री छत्रपती नागरी सहकारी बँक लि, पिंपळे निळख, जिल्हा - पुणे, महाराष्ट्र
ह्यांना दिल्या गेलेल्या निदेशांना आरबीआय कडून मुदतवाढ
श्री छत्रपती नागरी सहकारी बँक लि, पिंपळे निळख, जिल्हा - पुणे, महाराष्ट्र, ही बँक, निदेश युबीडी सीओ बीएसडी-1 क्र./ डी-09/12.22.460/2014-15 दि. सप्टेंबर 10, 2014 अन्वये, सप्टेंबर 12, 2014 रोजी कामकाज संपल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आली होती. वरील निदेशाची वैधता, मार्च 4, 2015 रोजीच्या निदेशाच्या अन्वये मार्च 11, 2015 रोजी कामकाज संपल्यानंतर आणखी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आली आहे. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, मार्च 04, 2015 च्या निदेशासह वाचित, सप्टेंबर 10, 2014 च्या निदेशाचा कालावधी, आमचा सप्टेंबर 01, 2015 च्या सुधारित निदेशाच्या अन्वये, (पुनरावलोकनाच्या अटीवर), सप्टेंबर 10, 2015 रोजी कामकाज संपल्यानंतर आणखी तीन महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. वरील बदल अधिसूचित केलेल्या, सप्टेंबर 01, 2015 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी त्या बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदलाचा अर्थ, त्या बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा समजण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक
वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/641 |