सप्टेंबर 15, 2015
राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी 2015-2016 नोव्हेंबर 28-29 रोजी
वित्तीय शिक्षणासाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनसीएफई), 2015-2016 वर्षासाठीची राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी (एनसीएफई - एनएफएटी 2015-2016), नोव्हेंबर 28 व 29, 2015 रोजी आयोजित करणार आहे. ह्या चाचणीमध्ये इयत्ता 8 ते 10 मधील विद्यार्थी भाग घेऊ शकतात.
सहकार्याच्या एका पध्दतीने, भारतामध्ये, वित्तीय साक्षरता व समावेशनाचे ध्येय अधिकतेने साध्य करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँक (आरबीआय), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), इन्शुअरन्स रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय), पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी (पीएफआरडीए) आणि फॉरवर्ड मार्केट्स कमिशन (एफएमसी) इत्यादींसारख्या सर्व वित्तीय क्षेत्र नियंत्रकांच्या पाठिंब्याने, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशनची (एनसीएफई) स्थापना केली आहे. वित्तीय शिक्षणासाठी राष्ट्रीय डावपेचांची (एनएसएफई) अंमलबजावणी करण्यासाठी ती एक नोडल एजन्सी म्हणून ओळखली जाते.
एनसीएफईची राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी (एनसीएफई-एनएफएलएटी) म्हणजे, वित्तीय साक्षरता व वित्तीय समावेशन ह्यांच्या दिशेने टाकलेले एक पाऊलच आहे. राष्ट्रीय स्तरावर एक चाचणी आयोजित केल्यामुळे, शाळेतील विद्यार्थ्यांना (इयत्ता 8 ते 10), त्यांच्या भावी आयुष्यात भक्कम असे वित्तीय निर्णय घेण्याची क्षमता यावी ह्यासाठी महत्वाची जीवन-कैाशल्ये अंगी बाणण्यासाठी त्यांच्या वित्तीय साक्षरतेचे मापन करण्याची व वित्तीय संकल्पनांची जाणीव करुन देण्याची एक योजनाच एनसीएफई आयोजित करत आहे.
शेड्युल
सप्टेंबर 1, 2015 पासून एनसीएफई-एनएफएलएटी साठीचे पंजीकरण सुरु झाले आहे आणि ते केवळ शाळांच्या मार्फत केल्यासच स्वीकारले जाईल. पुढील http://www.ncfeindia.org/nflat ने शाळा नोंदणी करु शकतात.
इतर महत्वाच्या तारखा :
तपशील |
तारीख |
पंजीकरण सुरु |
सप्टेंबर 1, 2015 |
पंजीकरण बंद |
ऑक्टोबर 17, 2015 |
परीक्षा |
नोव्हेंबर 28 व 29, 2015 |
निकाल |
डिसेंबर 16, 2015 |
ह्या चाचणीचा कालावधी 60 मिनिटे असून त्यात विद्यार्थ्यांना 75 प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. ही चाचणी इंग्रजी व हिंदी अशा दोन्हीही भाषांमध्ये असेल व त्यात वित्तसंबंधीच्या पायाभूत संकल्पनांच्या विषयांचा समावेश असेल. ह्या विषयांचा अभ्यासक्रम http://www.ncfeindia.org/nflat वर उपलब्ध आहे.
ही चाचणी निःशुल्क असून प्रथम आलेल्यानुसार पंजीकरण केले जाईल.
पारितोषिके
शाळांसाठी :
सर्वात वरच्या 30 शाळांना रु.25,000/- व ट्रॉफी/शील्ड दिले जाईल.
विद्यार्थ्यांसाठी :
एनसीएफई-एनएफएलएटी परीक्षेत यशस्वी होणारांचा, लॅपटॉप्स टॅबलेट्स, पदके, रोख रक्कम व प्रमाणपत्रे देऊन सन्मान केला जाईल.
अधिक माहितीसाठी :
एनसीएफई वेबसाईट : http://www.ncfeindia.org/nflat
अधिक माहिती/प्रश्नांसाठी संपर्क - नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सिक्युरिटीज् मार्केट्स, एनआयएसएम भवन, प्लॉट नं. 82, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई - 400703, फोन 022- 66735100-05, फॅक्स 022-66735100-05, ई-मेल
वेबसाईट : www.ncfeindia.org| www.nism.ac.in
अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/677 |