06 ऑक्टोबर, 2015
दि वाशीम नागरी सहकारी बँक लि. वाशीम (महाराष्ट्र) ह्यांचेवर
आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1) ब च्या तरतुदींनी दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि वाशीम नागरी सहकारी बँक लि., वाशीम (महाराष्ट्र) ह्यांना, तुमचा ग्राहक जाणा निकषांचे व आरबीआयच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल रु.5.0 लाख (रुपये पाच लाख फक्त) एवढा आर्थिक दंड केला आहे.
रिझर्व बँकेने वरील बँकेला, कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य व ह्याबाबतचे त्या बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँक ह्या निर्णयाप्रत आली की, ही उल्लंघने सत्य असून त्यासाठी हा दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/834 |