लक्ष्मी विष्णु सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या सूचना आरबीआय कडून मागे |
ऑक्टोबर 12, 2015
लक्ष्मी विष्णु सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर, महाराष्ट्र
ह्यांना दिलेल्या सूचना आरबीआय कडून मागे
ऑक्टोबर 12, 2015 ला कामकाज बंद झाल्यापासून, “लक्ष्मी विष्णु सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर, महाराष्ट्र “ ह्यांना मार्च 28, 2006 रोजी देण्यात आलेल्या सर्व-समावेशक सूचना भारतीय रिझर्व बँकेने मागे घेतल्या आहेत.
बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ च्या पोटकलम (2) खाली रिझर्व बँकेला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन ह्या सूचना मागे घेण्यात आल्या आहेत. हितसंबंध असलेल्या जनतेच्या माहितीसाठी ह्या आदेशाची एक प्रत बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. ह्यानंतर नेहमीचा बँक व्यवहार ही बँक सुरुच ठेवील.
संगीता दास
संचालक
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/886 |
|