‘पी’ हे इनसेट अक्षर असलेल्या रु.10 च्या बँक नोटा आरबीआय देणार |
ऑक्टोबर 14, 2015
‘पी’ हे इनसेट अक्षर असलेल्या रु.10 च्या बँक नोटा आरबीआय देणार
भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका- 2005 मधील, दोन्हीही नंबरिंग पॅनल्समध्ये पी हे इनसेट अक्षर असलेल्या व भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांची सही असलेल्या रु.10 मूल्याच्या बँक नोटा वितरित करणार आहे. 2015 हे छपाईचे वर्ष ह्या बँक नोटेच्या मागील बाजूवर छापण्यात आले आहे.
आता देण्यात येणा-या ह्या बँक नोटेचे डिझाईन, सर्व बाबतीत, महात्मा गांधी मलिका-2005 मधील आधी दिलेल्या रू.10 च्या बँक नोटांप्रमाणेच आहे.
भूतकाळात ह्या बँकेने दिलेल्या रु.10 च्या सर्व नोटाही एक वैध चलन असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/903 |
|