Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (60.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 05/11/2015
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद ह्यांना दिलेल्या सूचनांना, आरबीआयने फेब्रुवारी 03, 2016 पर्यंत मुदतवाढ

05 नोव्हेंबर, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद
ह्यांना दिलेल्या सूचनांना, आरबीआयने फेब्रुवारी 03, 2016 पर्यंत मुदतवाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद ह्यांना आरबीआयने दिलेल्या सूचनांना, नोव्हेंबर 4, 2015 पासून फेब्रुवारी 03, 2016 पर्यंतची मुदतवाढ, तीन महिन्यांसाठी, पुनरावलोकनाच्या अटीवर देण्यात आली आहे. ह्यां बँकेला मे 2012 पासून सूचनांखाली ठेवले होते. ह्यापूर्वीही ह्या सूचनांना, सहा वेळा, प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ च्या पोट कलम (1) खाली रिझर्व बँकेला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन ह्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी, ह्या सूचनांची एक प्रत बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या सूचनांचा अर्थ, ह्या बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे असा समजला जाऊ नये. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारेपर्यंत, ही बँक, निर्बंधांसह, बँकिंग व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या सूचनांमध्ये बदल करण्याचा विचारही रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1090

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä