Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (107.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 13/11/2015
आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये आयकराची बाकी प्रदान करा

नोव्हेंबर 13, 2015

आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये आयकराची बाकी प्रदान करा.

देय तारखेच्या ब-याच आधी, आयकराची रक्कम प्रेषण करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेद्वारा आयकरदात्यांना सांगण्यात येत आहे. त्यात असेही सांगण्यात आले आहे की, आय कर दाते, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा ह्या बँकांनी देऊ केलेली ऑनलाईन प्रदान सुविधा ह्यासारख्या पर्यायी रीतींचा वापर करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांबलचक रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल.

असे दिसून आले आहे की, दर वर्षी डिसेंबरच्या अखेरीस, रिझर्व बँकेच्या मार्फत कर प्रदान करण्यासाठी खूप मोठी गर्दी होते आणि त्यासाठी जास्तीत जास्त अतिरिक्त काऊंटर्स उघडूनही, त्याबाबतच्या पावत्या देणे रिझर्व बँकेसाठी अवघड होते.

आय कराचे प्रदान स्वीकारण्यासाठी पुढील एकोणतीस एजन्सी बँकांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

1. अलाहाबाद बँक 16. सिंडिकेट बँक
2. आंध्र बँक 17. यूको बँक
3. बँक ऑफ बड़ौदा 18. यूनियन बँक ऑफ इंडिया
4. बँक ऑफ इंडिया 19. यूनाइटेड बँक ऑफ इंडिया
5. बँक ऑफ महाराष्ट्र 20. विजया बँक
6. कॅनरा बँक 21. भारतीय स्टेट बँक
7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 22. स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपुर
8. कॉर्पोरेशन बँक 23. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
9. देना बँक 24. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
10. आयडीबीआय बँक 25. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
11. इंडियन बँक 26. स्टेट बँक ऑफ पटियाला
12. इंडियन ओवरसीज बँक 27. एचडीएफसी बँक लिमिटेड
13. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 28. अॅक्सिस बँक लिमिटेड
14. पंजाब अँड सिंध बँक 29. आयसीआयसीआय बँक लिमिटेड
15. पंजाब नॅशनल बँक    

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1142

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä