‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या ₹ 500/- च्या बँक नोटा आरबीआय देणार |
नोव्हेंबर 16, 2015
‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या ₹ 500/- च्या बँक नोटा आरबीआय देणार
दोन्हीही नंबरिंग पॅनल्समध्ये एल हे इनसेट अक्षर असलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील ₹ 500/- मूल्याच्या बँक नोटा, रिझर्व बँक लवकरच वितरित करणार आहे. ह्या नोटांवर रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही व मागील बाजूस 2015 हे छपाईचे वर्ष असेल. आता दिल्या जाणा-या ₹ 500/- च्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, ह्या आधी देण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिका - 2005 प्रमाणेच व अतिरिक्त लक्षणे (नंबर पॅनल्समध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स, व मागील बाजूवर मोठी केलेली ओळख-खूण) ह्यासह असेल. ही लक्षणे असलेल्या नोटा सर्वप्रथम सप्टेंबर 2015 मध्ये देण्यात आल्या होत्या.
रिझर्व बँकेने भूतकाळात दिलेल्या ₹ 500 मूल्याच्या सर्व नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.
अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1157 |
|