17 नोव्हेंबर, 2015
शताब्दी महिला सहकारी बँक लि. ठाणे, (जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र)
ह्यांना, आरबीआयने दिलेल्या सूचनांना, मे 17, 2016 पर्यंत मुदतवाढ
भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, तिने ऑगस्ट 14, 2014 च्या निदेशांनुसार, ऑगस्ट 20, 2014 रोजीच्या कामकाज बंद होण्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, शताब्दी महिला सहकारी बँक लि. ठाणे ह्यांना सूचनांखाली ठेवले होते. ह्या निदेशाची वैधता, पुढे 6 महिने व त्यापुढे 3 महिन्यांसाठी, अनुक्रमे फेब्रुवारी 04, 2015 व जुलै 21, 2015 च्या निदेशांनुसार वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येत आहे की, आमच्या, नोव्हेंबर 04, 2015 च्या सुधारित निदेशान्वये, फेब्रुवारी 04, 2015 व जुलै 21, 2015 रोजीच्या निदेशांसह वाचित, ऑगस्ट 14, 2014 रोजीच्या निदेशाचा कार्यकाल, सहा महिन्यांसाठी, म्हणजे, नोव्हेंबर 17, 2015 रोजीच्या व्यवहार बंद होण्यापासून, मे 17, 2016 पर्यंत, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, वाढविण्यात आला आहे. इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वरील सुधारणा समाविष्ट असलेल्या नोव्हेंबर 04, 2015 च्या निदेशाची प्रत जनतेच्या माहितीसाठी, सदरहू बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
रिझर्व बँकेने वरील निदेशात केलेल्या बदलाचा अर्थ, त्या बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे, असा लावण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1171 |