नोव्हेंबर 24, 2015
सार्वभैाम सुवर्ण रोखे - 2015-16
भारतीय रिझर्व बँकेन, भारत सरकारशी सल्लामसलत करुन, परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.939/14.04.050/2015-16, दिनांक ऑक्टोबर 30, 2015 आणि आयडीएमडी.सीडीडी.क्र.968/14.04.050/2015-16, दिनांक नोव्हेंबर 4, 2015 अन्वये, सार्वभैाम सुवर्ण रोखे देण्याबाबत अधिसूचित केले होते. सार्वभैाम सुवर्ण रोख्यांची माहिती फेरी, नोव्हेंबर 5 ते नोव्हेंबर 20, 2015 पर्यंत वर्गणीसाठी खुली होती. हे रोखे नोव्हेंबर 26, 2015 ला देण्यात येणार आहेत.
बँका व पोस्ट ऑफिसांमध्ये खूप मोठ्या संख्येने अर्ज आले होते. आरबीआयच्या ई-कुबेर प्रणालीत हे अर्ज सुलभतेने अपलोड करण्यासाठी (विशेषतः पोस्ट ऑफिसांमार्फत), सार्वभैाम सुवर्ण रोखे देण्याची तारीख नोव्हेंबर 26, 2015 ऐवजी नोव्हेंबर 30, 2015 करण्यात आली आहे.
वरील परिपत्रकातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
अनिरूध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1236 |