Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (61.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/11/2015
चौंडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना दिलेल्या सूचनांना, आरबीआयकडून 31 मे 2016 पर्यंत मुदतवाढ

नोव्हेंबर 30, 2015

चौंडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना दिलेल्या सूचनांना,
आरबीआयकडून 31 मे 2016 पर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 30, 2014 रोजी व्यवहार संपल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, चौंडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना, ऑगस्ट 28, 2014 पासून निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निदेशांची वैधता, दोन वेळा, म्हणजे, फेब्रुवारी 5, 2015 च्या आदेशानुसार 6 महिन्यांनी आणि जुलै 31, 2015 च्या आदेशानुसार तीन महिन्यांनी वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यत येत आहे की, फेब्रुवारी 5, 2015 चा निदेश व जुलै 31, 2015 चा निदेश सह वाचित, ऑगस्ट 28, 2014 च्या निदेशाचा कार्यकारी कालावधी, डिसेंबर 1, 2015 पासून मे 31, 2016 पर्यंत, आमचे सुधारित निदेश दि. नोव्हेंबर 23, 2015 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. संदर्भित निदेशातील अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वरील बदल केलेल्या, नोव्हेंबर 23, 2015 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, सदरहू बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने निदेशात बदल करणे याचा अर्थ वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेतला जाऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1271

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä