डिसेंबर 23, 2015
2005 पूर्वीच्या बँक नोटा, नेमलेल्या बँक शाखा व आरबीआयच्या
इश्यु कार्यालयांमधून जून 30, 2016 पर्यंत बदलून मिळणार
पुनरावलोकन केल्यानंतर, जनतेद्वारा त्यांच्या 2005 पूर्वीच्या नोटा बदलून देण्याची तारीख रिझर्व बँकेने जून 30, 2016 पर्यंत वाढविली आहे. तथापि, जानेवारी 1, 2016 पासून, ही सुविधा केवळ नेमलेल्या बँक शाखा (https://www.rbi.org.in/Regionalbranch/(कृपया येथे केंद्राचे नाव टाकावे)currencychest.aspx) आणि रिझर्व बँकेच्या इश्यु कार्यालयांमधूनच (https://www.rbi.org.in/Scripts/Regionaloffices.aspx) उपलब्ध असेल. रिझर्व बँकेने जून 2015 मध्ये, जनतेद्वारा 2005 पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख डिसेंबर 31, 2015 ठेवली होती.
ह्या नोटा प्रसारातून काढून घेण्यासाठी जनतेचे सहकार्य मिळविण्यासाठी रिझर्व बँक विनंती करत आहे की, 2005 पूर्वीच्या नोटा, नेमलेल्या बँक शाखा व रिझर्व बँकेची इश्यु कार्यालये ह्यामधूनच बदलून घेतल्या जाव्यात.
रिझर्व बँकेने असेही स्पष्ट केले आहे की, अशा सर्व नोटा वैध चलन असणे सुरुच राहील. ह्या कृतीबाबतचे स्पष्टीकरण देताना रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले की, महात्मा गांधी मालिकेमधील नोटा प्रसारात येऊन दहा वर्षे झाली आहेत. बहुतेक जुन्या नोटा, बँक शाखांद्वारे प्रसारातून काढून घेण्यात आल्या आहेत. ह्यासाठीच उरलेल्या बँक नोटाही प्रचलनातून काढून घेण्याचे ठरविण्यात आले आहे. रिझर्व बँकेने निर्देशित केले की, एकाच वेळी बहुविध मालिकांमधील नोटा प्रसारात न ठेवणे ही एक आंतरराष्ट्रीय पध्दतच आहे. जनतेला कोणतीही अडचण येऊ नये ह्यासाठी, रिझर्व बँक ह्या प्रक्रियेवर देखरेख ठेवून तिचे पुनरावलोकन करील.
अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1501
संबंधित वृत्तपत्र निवेदने/अधिसूचना |
फेब्रुवारी 11, 2016 |
2005 पूर्वी दिलेल्या, जुन्या मालिकांच्या सर्व नोटा काढून घेणे |
जून 25, 2015 |
2005 पूर्वीच्या मालिकांच्या काढून घेण्याच्या तारखेत आरबीआयकडून मुदतवाढ |
डिसेंबर 23, 2014 |
2005 पूर्वीच्या बँक नोटा, जून 30, 2015 पूर्वी आपल्या खात्यात जमा करा : आरबीआयची जनतेला विनंती |
मार्च 3, 2014 |
2005 पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याची तारीख आरबीआयकडून जानेवारी, 2015 पर्यंत वाढविली |
जानेवारी 24, 2014 |
2005 पूर्वी दिलेल्या बँक नोटा काढून घेणार - आरबीआयचे स्पष्टीकरण |
जानेवारी 22, 2014 |
2005 पूर्वी दिलेल्या नोटा काढून घेतल्या जाणार : आरबीआयचा सल्ला |
|