Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (417.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/01/2016
जिजामाता महिला सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना जुलै 9, 2016 पर्यंत मुदतवाढ

जानेवारी 10, 2016

जिजामाता महिला सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयने
दिलेल्या निदेशांना जुलै 9, 2016 पर्यंत मुदतवाढ

रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, बँकिंग रेग्युलेशन अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली दिलेल्या दि. जुलै 8, 2015 च्या निदेशाच्या अन्वये, जिजामाता महिला सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना, जुलै 10, 2015 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तिच्या निदेशांखाली ठेवण्यात आले होते. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, वरील निदेशाची वैधता, जानेवारी 10, 2016 पासून जुलै 9, 2016 पर्यंत, आमचे सुधारित निदेश दि. 4 जानेवारी 2016 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आली आहे. संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जानेवारी 4, 2016 च्या निदेशांची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, त्या बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने उपरीनिर्दिष्ट निदेशांमध्ये बदल केला आहे ह्याचा अर्थ, त्या बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे, असा लावला जाऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1617

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä