जानेवारी 15, 2016
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना - प्रचालनाचे मूल्य
सार्वभौम सुवर्ण रोखे, जानेवारी 18 ते 22, 2016 ह्या कालावधीसाठी वर्गणीसाठी खुले असतील. ह्या फेरीसाठी, सार्वभौम सुवर्ण रोख्याचे प्रचालन मूल्य, रु.2600/(रुपये दोन हजार सहाशे फक्त) प्रतिग्राम सोने, असे ठरविण्यात आले आहे. इंडिया बुलियन अँड ज्युवेलर्स असोसिएशन(आयबीजेए) ह्यांनी प्रसिध्द केल्यानुसार, हा दर, 999 शुध्दतेच्या सोन्याच्या मागील आठवड्याच्या (जानेवारी 11 ते 15, 2016) साध्या सरासरी दरावर आधारित आहे.
हा इश्यु, जीओएल अधिसूचना एफ. क्र.4(19)-डब्ल्यु आणि एम/2014 व रिझर्व बँकेचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.1573/14.04.050/2015-16 दिनांक, जानेवारी 14, 2016 अनुसार आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1680 |