Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (66.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 22/01/2016
अंक-फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स व मोठी केलेले ‘E’ ओळख चिन्ह असलेल्या रु.500 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार

जानेवारी 22, 2016

अंक-फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स व मोठी केलेले ‘E’ ओळख चिन्ह असलेल्या रु.500 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार

भारतीय रिझर्व बँक लवकरच, पुढील तीन अतिरिक्त/सुधारित लक्षणे असलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, रु.500 च्या नोटा प्रसृत करणार आहे. दोन्हीही अंक-फलकात ‘E’ हे इनसेट अक्षर, नोटेच्या मागील बाजूवर, गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही व 2015 हे छपाईचे वर्ष.

ह्या नोटेचे डिझाईन, पूर्वी देण्यात आलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील रु.500 च्या नोटांप्रमाणेच असेल. तथापि, ह्या नोटांच्या अंक-फलकांमध्ये, वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स व मागील बाजूस मोठे ओळख-चिन्ह असेल. ही लक्षणे असलेल्या नोटा सर्वप्रथम सप्टेंबर 2015 मध्ये प्रसृत केल्या गेल्या होत्या.

भारतीय रिझर्व बँकेने, ऑगस्ट 2015 मध्ये, तेच इनसेट अक्षर असलेल्या, अंक-फलकात वाढत्या आकाराचे अंक असलेल्या परंतु ब्लीड लाईन्स व मोठे ओळख-चिन्ह नसलेल्या रु.500 च्या नोटा दिल्या होत्या. आता प्रसृत केल्या जाणा-या नोटांसह, वरील नोटाही एकत्रच प्रसारात असतील.

ह्या बँकेने पूर्वी दिलेल्या रु.500 च्या बँक नोटाही वैध असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1732

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä