जानेवारी 22, 2016
आरबीआय, अंक फलकात वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स आणि
मोठे ओळख चिन्ह असलेल्या रु.100च्या नोटा, प्रसारित करणार.
बँक नोटांचे डिझाईन/सुरक्षा लक्षणे ह्यात सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणून, व बनावट नोटा छापण्यास प्रतिबंध घालण्यासाठी, रिझर्व बँकेने अलिकडेच, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या रु.100, रु.500 व रु.1000 च्या नोटा सुरु केल्या होत्या. ह्या लक्षणाबाबत वृत्तपत्र निवेदने क्र. (i) 2014-2015/2750 dated June 25, 2015, (ii) 2015-2016/343 dated August 7, 2015, (iii) 2015-2016/466 dated August 21, 2015, मध्ये ह्या नोटा प्रथमच देतेवेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर, आमचे वृत्तपत्र निवेदन क्र. 2015-2016/725 dated September 22, 2015 मध्ये दिल्यानुसार, दोन अधिक लक्षणे असलेल्या, (वाढत्या आकाराच्या अंकाव्यतिरिक्त) म्हणजे, ब्लीड लाईन्स व मोठे ओळख-चिन्ह असलेल्या रु.500 व रु.1000 च्या नोटाही प्रसृत करण्यात आल्या आहेत.
भारतीय रिझर्व बँक, विद्यमान असलेल्या लक्षणांच्या व्यतिरिक्त, वरील तीनही लक्षणे असलेल्या (म्हणजे, अंक फलकात वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स व मोठे ओळख चिन्ह), महात्मा गांधी मालिका 2005 मधील रु.100 च्या नोटा प्रसारात आणणार आहे. ह्या नोटांची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे :
अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक :
ह्या बँक नोटांमधील दोन्हीही अंक फलकांमधील डावीकडून उजवीकडे वाढत्या आकाराचे असतील, तर पहिले तीन अक्षरे-अंक एकाच आकाराचे असतील.
ब्लीड लाईन्स :
अधू दृष्टीच्या/अंध व्यक्तींना नोटेचे मूल्य ओळखता येण्यासाठी, ह्या नोटेच्या पुढच्या बाजूवर, डाव्या व उजव्या बाजूस कडेला 2-2 रेषांचे 2 संच अशा चार तिरप्या ब्लीड लाईन्स असतील.
मोठे केलेले ओळख चिन्ह :
बँक नोटेच्या डावीकडील कडेजवळ असलेले विद्यमान ओळख चिन्ह (त्रिकोण) मोठे करण्यात आले आहे.
ही लक्षणे असलेल्या रु.100 च्या नोटेचे चित्र खाली दिले आहे.
सदरहू नोटांमध्ये अंक फलकामध्ये ई हे इनसेट अक्षर असेल. नोटांवर रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही असेल. छपाईचे वर्ष (2015) मागच्या बाजूवर छापलेले असेल.
हे सांगावयास नकोच की, केवळ अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या (परंतु ब्लीड लाईन्स व मोठे ओळख चिन्ह नसलेल्या) रु.100 च्या नोटा देखील आता दिलेल्या वरील तीनही लक्षणेयुक्त नोटां बरोबर प्रसारात असतील.
रिझर्व बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या व ह्याच मूल्याच्या सर्व बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1733 |