Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (73.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/01/2016
“डॉ. बी आर आंबेडकर ह्यांच्या 125व्या जयंती” निमित्त रु.10 ची नाणी प्रसारीत करणे

जानेवारी 28, 2016

“डॉ. बी आर आंबेडकर ह्यांच्या 125व्या जयंती”
निमित्त रु.10 ची नाणी प्रसारीत करणे

भारत सरकारने, डॉ. बी आर आंबेडकर ह्यांच्या 125 व्या जयंतीच्या स्मृत्यर्थ 10 ची नाणी तयार केली असून, रिझर्व बँकेद्वारा ती लवकरच प्रसारित केली जातील.

वित्त मंत्रालयाच्या आर्थिक विभागाने प्रसिध्द केलेल्या, ऑक्टोबर 26, 2015 रोजीच्या भारतीय राजपत्र असाधारण - भाग 2, कलम 3, पोटकलम (1) - क्र. 565 मध्ये अधिसूचित केल्यानुसार, ह्या नाण्यांचे डिझाईन पुढीलप्रमाणे आहे.

दर्शनी बाजू

नाण्याच्या पृष्ठभागावर मध्यभागी अशोक स्तंभातील सिंह मुद्रा व त्याखाली ‘सत्यमेव जयते’ कोरले असेल. डावीकडील कडेजवळ देवनागरी मध्ये ‘भारत’ व उजव्या कडेजवळ इंग्रजीमध्ये INDIA हे शब्द असतील. सिंह मुद्रेच्या खाली हे चिन्ह व 10 अंक आंतरराष्ट्रीय अंकात दिला असेल.

मागील बाजू

ह्या पृष्ठभागावर मध्यभागी डॉ. बी आर आंबेडकरांची प्रतिमा, वरच्या कडेजवळ “डॉ. बी आर आंबेडकर की 125 वी जयंती” हे शब्द देवनागरी मध्ये, आणि खालच्या कडेजवळ “125th BIRTH ANNIVERSARY OF Dr. B. R. AMBEDKAR” इंग्रजीमध्ये कोरलेले असेल. डॉ. बी आर आंबेडकरांच्या प्रतिमेच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकात “2015” हे वर्ष दिले असेल.

कॉईनेज अधिनियम, 2011 मध्ये दिल्यानुसार ही नाणी वैध चलन आहेत. ह्याच मूल्याची पूर्वी दिलेली नाणीही वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1771

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä