Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (59.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 02/02/2016
‘R’ हे इनसेट असलेल्या रु.100 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार

फेब्रुवारी 2, 2016

‘R’ हे इनसेट असलेल्या रु.100 च्या नोटा आरबीआय प्रसृत करणार

रिझर्व बँक लवकरच, तीन अतिरिक्त/सुधारित लक्षणे असलेल्या-म्हणजे, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘R’ हे इनसेट अक्षर, गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही व मागील बाजूवर ‘2015’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील रु.100 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे.

देण्यात येणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन, पूर्वी दिल्या गेलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु.100 च्या नोटांप्रमाणेच असेल. तथापि, ह्या नोटांमध्ये अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स आणि नोटेच्या पुढील बाजूवर मोठे ओळख चिन्ह. वरील तिन्हीही लक्षणांनी युक्त (निराळेच इनसेट अक्षर असलेल्या) अशा रु.100 च्या नोटा, अलिकडेच प्रसारित करण्यात आल्या आहेत.

ब्लीड लाईन्स तसेच मोठे ओळख चिन्ह नसलेल्या, परंतु तेच इनसेट अक्षर (‘R’) व अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या, रु.100 च्या नोटा, रिझर्व बँकेने आधी प्रसृत केल्या होत्या. आता देण्यात येणा-या बँक नोटांबरोबर, ह्या नोटाही एकाच वेळी प्रसारात राहतील.

रिझर्व बँकेने पूर्वी दिलेल्या रु.100 च्या नोटा ह्या, वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1814

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä