फेब्रुवारी 3, 2016
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र
ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये आरबीआयकडून, मे 3, 2016 पर्यंत मुदतवाढ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये, आरबीआयने, पुनरावलोकनाच्या अटीवर, फेब्रुवारी 4, 2016 ते मे 3, 2016 पर्यंत अशी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही बँक मे 2012 पासून निदेशां खाली होती. ह्यापूर्वी ह्या निदेशांना प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ सहा वेळा आणि एक वेळा, तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ च्या पोटकलम (1) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन हे निदेश देण्यात आले होते. ह्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
हे निदेश दिले गेले ह्याचा अर्थ, रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केला आहे असा समजण्यात येऊ नये. ह्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ही बँक निर्बंधांसह, बँकिंगचे व्यवहार करणे सुरुच ठेवील. परिस्थितीवर अवलंबून, रिझर्व बँक ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार करील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1829 |