Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/02/2016
दिलीप नागरी सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मे 6, 2016 पर्यंत मुदतवाढ

फेब्रुवारी 6, 2016

दिलीप नागरी सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मे 6, 2016 पर्यंत मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, दिलीप नागरी सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर ह्यांना, निदेश दि. ऑगस्ट 6, 2014 अन्वये, ऑगस्ट 8, 2014 रोजी व्यवहार बंद केले गेल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवले गेले होते. आमचे निदेश दि. जानेवारी 20, 2015 व निदेश दि. जुलै 27, 2015 अन्वये, ह्या निदेशांची वैधता दोन वेळा, प्रत्येकी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येत आहे की, निदेश दि. जानेवारी 20, 2015 व जुलै 27, 2015 सह वाचित, दि. ऑगस्ट 6, 2014 चा कार्यकारी कालावधी, फेब्रुवारी 6, 2016 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून ते मे 6, 2016 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर, दि. जानेवारी 27, 2016 च्या आमच्या सुधारित निदेशाच्या अन्वये आणखी तीन महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील बदल अधिसूचित केलेल्या, निदेश दि. जानेवारी 27, 2016 ची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, सदरहू बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदलाचा अर्थ, ह्या बँकेच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत आरबीआयचे समाधान झाले आहे असा घेतला जाऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1859

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä