फेब्रुवारी 12, 2016
दि कच्छ मर्कंटाईल सहकारी बँक लि., रापार, जिल्हा कच्छ (गुजराथ)
ह्यांच्यावर आरबीआयकडून आर्थिक दंड जारी
बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या, कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(ब) खालील तरतुदीनुसार, मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि कच्छ मर्कंटाईल सहकारी बँक लि.; रापार, जिल्हा कच्छ, (गुजराथ) ह्यांना पुढील उल्लंघनांसाठी रु.5.00 लाख (रु.पाच लाख फक्त) आर्थिक दंड ठोठावला आहे.
-
बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 36(1) खाली रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन न करणे.
-
केवायसी नॉर्म्सचे मोठ्या प्रमाणावर पालन न करणे.
-
शंकास्पद व्यवहार ओळखण्यासाठी कोणतीही प्रणाली/व्यवस्था ठेवली नसणे.
रिझर्व बँकेने, ह्या बँकेला, एक कारणे दाखवा नोटिस दिली होती. त्या नोटिसीला ह्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व बँकेचे उत्तर ह्यावर विचार करुन, आरबीआयने निष्कर्ष काढला की वरील उल्लंघने निश्चित झाली असून, त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1916 |